मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भरधाव ट्रेन येत असतानाच प्लॅटफॉर्मवरून पाय घसरून रूळांवर पडली व्यक्ती आणि...; धडकी भरवणारा VIDEO

भरधाव ट्रेन येत असतानाच प्लॅटफॉर्मवरून पाय घसरून रूळांवर पडली व्यक्ती आणि...; धडकी भरवणारा VIDEO

ट्रेन यायला आणि व्यक्ती रूळांवर पडायला ही संपूर्ण थराराक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ट्रेन यायला आणि व्यक्ती रूळांवर पडायला ही संपूर्ण थराराक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ट्रेन यायला आणि व्यक्ती रूळांवर पडायला ही संपूर्ण थराराक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

  • Published by:  Priya Lad
बंगळुरू, 17 जुलै : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता रेल्वे प्रशासानानेही एक असा व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो चांगलाच चर्चेत आहे. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. एक व्यक्ती ट्रेन येण्याच्या काही सेकंद आधीच प्लॅटफॉर्मवरून रूळांवर पडली. त्यानंतर भरधाव ट्रेन आली आणि पुढे जे काही घडलं तो संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कर्नाटकच्या बंगळुरूतील केकेके आर पुरम रेल्वे स्टेशनवरील ही घटना. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातील सर्वकाही शांत वाटतं आहे. पण तुम्ही नीट पाहाल तर एक व्यक्ती रेल्वे रूळांवर दिसते आहे. ही व्यक्ती प्लॅटफॉर्मवरून पाय घसरून खाली कोसळली. त्याच वेळी समोरून ट्रेन येत असते. अचानक तिथं असलेल्या एका पोलिसाचं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं आणि तो त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तिच्या दिशेने धावतो. हे वाचा - Pitbull सारख्या खतरनाक Dog Attack मध्ये कसा वाचवाल स्वतःचा जीव; पाहा हा VIDEO त्यानंतर तिथं उपस्थित असलेले सर्व रेल्वे पोलीस त्या व्यक्तीसाठी धावून येतात. समोरून ट्रेन येत असतानाही पोलीस त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकतात. कसंबसं करून त्या व्यक्तीला रूळांवरून प्लॅटफॉर्मवर आणलं जातं. जशी ही व्यक्ती आणि पोलीस प्लॅटफॉर्मवर येतात त्याच क्षणी भरधाव ट्रेन तिथून जाते. थोडा जरी उशीर झाला असता तर हीच ट्रेन त्यांच्या अंगावरून गेली असती. ट्रेनचा वेग इतका होता की कुणीच वाचलं नसतं. सुदैवाने तसं झालं नाही. हे वाचा - बाप रे बाप! गगनचुंबी इमारतीवर इतका Dangerous stunt; हार्ट कमजोर असेल तर जपूनच पाहा हा VIDEO संपूर्ण व्हिडीओ पाहताना काही मिनिटासाठी आपला श्वासही थांबतो. पोलिसांमुळे या व्यक्तीचा जीव वाचला आहे. त्यांचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.
First published:

Tags: Railway, Railway accident, Train, Viral, Viral videos

पुढील बातम्या