मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बिच्चारा नवरदेव! वरातीत घोड्यावर बसतानाच फाटली पँट; पुढे काय घडलं पाहा VIDEO

बिच्चारा नवरदेव! वरातीत घोड्यावर बसतानाच फाटली पँट; पुढे काय घडलं पाहा VIDEO

फाटलेल्या पँटमुळे वरातीत अडलं नवरदेवाचं घोडं.

फाटलेल्या पँटमुळे वरातीत अडलं नवरदेवाचं घोडं.

फाटलेल्या पँटमुळे वरातीत अडलं नवरदेवाचं घोडं.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 25 डिसेंबर : लग्नात सर्वांना उत्सुकता असते ती वरातीची. नवरीबाईला आणण्यासाठी आणि तिला घेऊन येताना बँडबाजासह वाजतगाजत वरात काढली जाते. यावेळी घोड्यावर बसलेल्या नवरदेवाचा एक वेगळाच थाट असतो. घोड्यावर तोऱ्यात बसायला गेलेल्या अशाच एका नवरदेवाची वरातीत चांगलीच फजिती झाली. वरातीतच नवरदेवाची पँट फाटली. लग्नाच्या वरातीचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. इतके दिवस लग्नाची इतकी तयारी करूनही नवरदेवासोबत नको तेच घडलं. वरातीतच घोडं अडलं आणि याचं कारण म्हणजे नवरदेवाची पँट. घोड्यावर चढण्याआधीच या नवरदेवाची पँट फाटली. अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता वरात निघण्याच्याच तयारीत असते. नवरा घोड्यावर चढायला जातो आणि त्याच्यासोबत मोठी घटना घडते. नवरदेवाची पँट फाटते. लग्नाचे कपडे ऐनवेळी फाटणं यापेक्षा मोठी समस्या नवरदेवासाठी दुसरी कोणती असेल. कारण लग्नासाठी खास ड्रेस तर बनवून घेतला जातो. त्यामुळे कपडे फाटल्याने हा नवरदेवही संतप्त झाला आहे.
फजितीनंतर नवऱ्याचा पारा चढला आणि वऱ्हाड्यांवरच त्याने आपला राग व्यक्त केला. नवदेवाचा हा आवेश पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही. रागावून तो वऱ्हाड्यांना म्हणाला देखील, ‘माझी पँट फाटली आहे...’ आणि त्यानंतर तो दुसरी पँट आणण्याचे आदेशही वऱ्हाड्यांना देतो. या व्हिडीओ वरातीमधीलच कुणीतरी रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल होतो आहे. हे वाचा - VIDEO - नवरदेवाचं तोंड पाहताच नवरीबाईची सटकली; लग्न राहिलं बाजूला आधी केली धुलाई घंटा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding, Wedding video

पुढील बातम्या