मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! टीव्हीचा रिमोट शोधताना महिलेला सापडली 13 वर्षांपूर्वीची 'ती' गोष्ट, पाहून बसला धक्का

OMG! टीव्हीचा रिमोट शोधताना महिलेला सापडली 13 वर्षांपूर्वीची 'ती' गोष्ट, पाहून बसला धक्का

व्हायरल

व्हायरल

आपल्या घरात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या वर्षानुवर्षे एकाच जागी असतात. नकळत आपण त्यांची जागाही बदलत नाही. साफसफाई करताना वर्षानुवर्षे जुन्या असलेल्या गोष्टी सापडून जातात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : आपल्या घरात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या वर्षानुवर्षे एकाच जागी असतात. नकळत आपण त्यांची जागाही बदलत नाही. साफसफाई करताना वर्षानुवर्षे जुन्या असलेल्या गोष्टी सापडून जातात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे. एका महिलेला रिमोट शोधण्याच्या नादात 13 वर्षांपूर्वीची गोष्ट सापडली.

सध्या समोर आलेली घटना ऐकून तुम्हीदेखील थक्क व्हाल. महिलेने टिकटॉकवर अकाऊंटवर तिच्यासोबत घडलेला प्रकार शेअर केला. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, महिलेने सांगितलं, खरंतर ती महिला टीव्हीचा रिमोट शोधत होती. सोफ्याजवळ रिमोट पडल्याचं महिलेला वाटलं, म्हणून तिने सोफा हलवायला सुरुवात केली. रिमोट शोधताना तिने सोफ्यावर ठेवलेली उशी काढली. आणि त्या महिलेला सोफ्याच्या आत असलेल्या बॉक्समध्ये काहीतरी विचित्र दिसले. मग तिने हळूच तिथून सोफा काढायला सुरुवात केली. शेवटी खालून सोफा उघडताच त्या महिलेला सोफ्याच्या खाली बॉक्समध्ये बरंच काही पडल्याचं दिसलं. हे सगळं बघून बाई गोंधळून गेली.

हेही वाचा - हे तर अजबच! आधी प्रेग्नंट आणि नंतर लग्न हा नक्की काय प्रकार, या परंपरेविषयी माहितीये का?

महिलेने तो बॉक्स उघडला असता त्यात अनेक वर्षांपासून कचरा साचत असल्याचे दिसले. महिलेने सांगितले की, हा सोफा 13 वर्षांपूर्वी ठेवण्यात आला होता. तेव्हापासून हा कचरा सतत त्यात जमा होत होता. अखेर टीव्हीच्या रिमोटच्या बहाण्याने महिलेने तो सोफा साफ केला आणि सर्व कचरा काढला. सध्या ही घटना चांगलीच चर्चेत आली आहे.

दरम्यान, अशा अनेक विचित्र घटना घडत असतात. आपल्या घरातील बऱ्याच गोष्टी आपल्याला अनेक वर्षांनंतर सापडतात. असंच काहीसं या महिलेसोबत घडलं. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

First published:

Tags: Shocking, Viral, Viral news