Home /News /viral /

लग्नाआधीच नवरदेवाने केलेली विचित्र मागणी ऐकून शरमली नवरीबाई, Wedding Video

लग्नाआधीच नवरदेवाने केलेली विचित्र मागणी ऐकून शरमली नवरीबाई, Wedding Video

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा आहेत. याठिकाणी वरमाळा घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे.

  नवी दिल्ली 19 जानेवारी : लग्नादरम्यान काहीतरी वेगळं करायचं अशी प्रत्येक नवरदेव आणि नवरीची (Bride and Groom) इच्छा असते. लग्नात कोणते कपडे घालायचे आणि कशाप्रकारे सगळं एन्जॉय करायचं, याचंही प्लॅनिंग नवरी आणि नवरदेव आधीच करतात. मात्र, अनेकदा असं काही घडतं ज्याचं प्लॅनिंग या कपलने आधी केलेलं नसतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Wedding Video) होत आहे. यात दिसतं, की नवरदेवाने नवरीकडे अशी काही मागणी केली, जी ऐकूनच नवरीबाई शरमली. बॉयफ्रेंडने कॉल न उचलल्याने भडकली 12 वर्षीय गर्लफ्रेंड;रागात केला विचित्र प्रताप सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा आहेत. याठिकाणी वरमाळा घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे. यादरम्यान नवरीने नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घातली आणि नंतर ती नवरदेवाने वरमाळा घालावी यासाठी वाट पाहात राहिली. मात्र, नवरदेव मस्तीच्या मूडमध्ये दिसतो. तो हसत-हसत नवरीकडे अशी मागणी करतो, जी ऐकताच नवरीबाई आश्चर्यचकीत होते.
  इशारा करत नवरदेवाने नवरीला म्हटलं की माझ्या गालावर किस करावा लागेल, त्याशिवाय वरमाळा घालणार नाही. हे ऐकताच नवरीबाई लाजली आणि मग तिने अतिशय रोमँटिक अंदाजात नवरदेवाला किस केलं. किस केल्यानंतर लगेचच नवरदेवाने नवरीच्या गळ्यात वरमाळा घातली.

  VIDEO: भडकलेल्या नवरीचा रुद्रावतार; दुकानात जात फाडले लाखो रुपयांचे कपडे

  सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचा हा वेगळा अंदाज लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हे अतिशय कमी वेळा पाहायला मिळतं, ज्यात नवरदेव सर्वांसमोरच नवरीबाईला किस मागतो. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ Weddings Unfolded नावाच्या अकाऊंटवरुन अपलोड केला गेला आहे. व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळत आहे. व्हिडिओ 66 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. तर 10 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर यूजर्स निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Video Viral On Social Media, Wedding video

  पुढील बातम्या