Home /News /viral /

बाप रे! गाडीच्या बोनेटवर बसला भलामोठा हत्ती, ड्रायवरनं काय केलं पाहा VIDEO

बाप रे! गाडीच्या बोनेटवर बसला भलामोठा हत्ती, ड्रायवरनं काय केलं पाहा VIDEO

या व्हिडीओला आतापर्यंत 34 हजारहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

    मुंबई, 24 जून : अनेक रस्ते हे जंगलातून जाणारे असतात. तेव्हा अशावेळ अचानक समोर आलेल्या प्राण्याला इजा न पोहोचवता आणि त्याच्यापासून आपल्याला इजा होणार नाही याची काळजी बाळगून पुढे जाणं महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा हे प्राणी आपलं वाटही अडवतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बऱ्याचदा हत्ती वेगवेगळे स्टंट करताना आपण पाहिले आहेत. कधी संगीत ऐकताना कधी नदीत अंघोळ करताना तर कधी म्युझिकवर मान डोलवताना. आता तर हत्तीनं मात्र कहरच केला. कार आवडल्यानं त्यानं थेट कारच्या बोनेटवर आपली बैठक ठोकली. रस्त्यात उभी असलेली कार हत्तीला आवडली आणि त्यानं कारच्या बोनेटवर मुक्काम ठोकला. हत्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @buitengebieden नावाच्या ट्विटर युझरने शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'न बोलवताही तुम्ही माझ्या घरी पोहोचलात ना आता काय होईल ते मी सांगतो...!' या व्हिडीओला आतापर्यंत 34 हजारहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 208 युझरने रिट्वीट केला आहे. सोशल मीडियावर या हत्तीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    पुढील बातम्या