Home /News /viral /

VIDEO - सायकलवर स्टंट करत होता लहान मुलगा; अचानक निघालं सायकलचं चाक आणि...

VIDEO - सायकलवर स्टंट करत होता लहान मुलगा; अचानक निघालं सायकलचं चाक आणि...

सायकलवर स्टंट करताना सायकलचं एक चाक निघालं आणि मुलासोबत घडली दुर्घटना.

  मुंबई, 30 एप्रिल : हल्ली प्रसिद्ध होण्यासाठी लोक खतरनाक, जीवघेणे स्टंटही करताना दिसतात आणि हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतात. स्टंटबाजी करण्यात लहान मुलंही मागे नाहीत (Shocking stunt video). तरुणांच्या बाईक स्टंटचे व्हिडीओ पाहून लहान मुलं सायकलसोबत असे स्टंट करताना दिसतात. अशाच सायकलसोबत स्टंट करणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्याच्यासोबत स्टंट करताना दुर्घटना घडली आहे (Boy cycle stunt video). स्टंट करणं म्हणजे जीव धोक्यात टाकणं. स्टंटबाजी करताना कधी काय होईल सांगू शकत नाही. या मुलासोबतही असंच घडलं. सायकल चालवता चालवता त्याच्या सायकलचं चाक निघालं. त्यानंतर त्या मुलासोबत जे घडलं ते धडकी भरवणारं आहे. व्हिडीओत पाहू शकता मुलगा सायकल चालवत होता. त्यानंतर तो सायकलचं हँडल वर करून एक चाक वर करतो आणि एका पायावरच सायकल चालवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी सायकलचं पुढील चाक निघून वेगळं होतं. मुलगा एका चाकावर काही अंतरापर्यंत सायकल चालवतो. सायकल त्या चाकाजवळ नेऊन त्यावर ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. पण ते चाक दुसऱ्या दिशेला जातं आणि तरुण पुढे जोर लावताच त्याचा तोल जाऊन तो सायकलवरून जमिनीवर धाडकन कोसळतो. जमिनीवर तो उलटा पडतो. त्याचं तोंड इतक्या जोरात आदळतं की त्याला नक्कीच मोठी दुखापत झाली असावी. हे वाचा - आजोबांचा खतरनाक BIKE STUNT VIDEO पाहून पोलीसही हादरले; केली कठोर कारवाई @deepakprajapat1580 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  काही दिवसांपूर्वीच असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात मुलगा सायकल चालवत असताना त्याच्या सायकलचं मागील चाक अचानक निघालं. पण तरीही त्या मुलाने सायकल अगदी व्यवस्थितपणे बॅलन्स केली. हे वाचा - डोंगरावरुन कोसळलेला मोठा दगड भरधाव वेगातील दुचाकीवर पडला; विचित्र अपघाताचा LIVE VIDEO चाक निघाल्यानंतरही तो सायकल चालवणं थांबवत नाही आणि सायकल चालवणं सुरूच ठेवतो. या मुलाचं टॅलेंट पाहून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. या क्लिपमधील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी मुलाने हेल्मेटशिवाय इतर कोणतंही सेफ्टी किट घातलेलं नाही. स्टंट करताना चुकूनही काही गडबड झाली असती, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.
  हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nautretallent नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. एका यूजरने लिहिलं की, "हा स्टंट करण्यासाठी त्या व्यक्तीने अनेक वर्षे मेहनत केली असावी. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'हा एक उत्तम स्टंट आहे.' आणखी एकाने याला अप्रतिम टॅलेंट म्हटलं आहे. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Stunt video, Viral, Viral videos

  पुढील बातम्या