Home /News /viral /

साप, कोळी की आणि काही? सरपटणाऱ्या विचित्र प्राण्याला पाहून नेटकरी हैराण, VIDEO व्हायरल

साप, कोळी की आणि काही? सरपटणाऱ्या विचित्र प्राण्याला पाहून नेटकरी हैराण, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर काही अचंबित करणाऱ्या गोष्टी व्हायरल होतात. काही व्हिडीओ असे असतात की निसर्ग किती अद्भूत आहे, याची आपल्याला जाणीव होते.

    मुंबई, 26 जून : सोशल मीडियावर काही अचंबित करणाऱ्या गोष्टी व्हायरल होतात. काही व्हिडीओ असे असतात की निसर्ग किती अद्भूत आहे, याची आपल्याला जाणीव होते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना सुरूवातीला असे वाटते की एक साप एका पाण्यातील दगडावरून सरपटत आहे. काही वेळासाठी आपण याच भ्रमात असतो की हा साप आहे. पण जसजसा तो सरपटू लागतो, तसे थोडा वेळाने त्याचे खरे रूप आपल्याला दिसून येते. जेव्हा हा सरपटणारा प्राणी कॅमेऱ्यामध्ये फूलफ्रेम कैद होतो, त्यावेळी तुम्हाला जाणीव होईल की याआधी तुम्ही असा सरपटणारा कधी पाहिलाच नाही आहे. एखाद्या कोळ्याप्रमाणे या प्राण्याचे पाय आहे, मध्यभागी फुगलेल्या भागापासून सुरू होऊन टोकापर्यंत निमुळते. त्याला एकूण पाच पाय आहेत, आणि हेच पाय सापाचा भास निर्माण करतो. त्याच्याच साहाय्याने सरपटत हा प्राणी पुढे सरकत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही आहे. (हे वाचा-याठिकाणी ग्रहणाआधी दिसले दोन सूर्य? वाचा व्हायरल PHOTO मागील सत्य) लिंडा रेली या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिला हा व्हिडीओ शेअर करताना देखील असा प्रश्न पडला आहे की, हे नेमकं आहे काय. लिंडाने केवळ एवढंच कॅप्शन दिले आहे की, 'हे काय आहे?' (हे वाचा-VIDEO : अगदी शांतपणे पकडला सिंकमध्ये आलेला भलामोठा पायथॉन, नेटकरी आश्चर्यचकित) या पोस्टवर अनेकांनी उत्तर देत तिच्या शंकेचं निरसन देण्याचा प्रयत्न केला आहे. तीन लाखापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. मात्र हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या ट्विटर युजरला उत्तर देण्याऐवजी कमेंट सेक्शनमध्ये सर्वाधिक प्रश्नच दिसत आहेत. काहींनी या प्राण्याला वर्ष 2020 ची उपमा दिली आहे तर कुणी त्याला ऑस्ट्रेलियन म्हणत आहे.  
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या