Pulse Oximeter काय असतं? कोरोना काळात कसं वापराल हे यंत्र?

Pulse Oximeter काय असतं? कोरोना काळात कसं वापराल हे यंत्र?

पल्स ऑक्सिमीटर हे एक असं डिव्हाईस आहे जे शरीरातील ऑक्सिजनची सॅचुरेशन लेव्हल (oxygen saturation level)मोजण्यात आपल्याचा मदत करते.

  • Share this:

मुंबई 20 एप्रिल: कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णसंख्या दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. दुसरीकडे मृतांची संख्यादेखील वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 2लाख 59 हजार 170 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.तर,1,761 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 20 लाखांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. या आधी रविवारी 273,810रुग्ण आढळले होते. तर,1,619जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची साथ आल्यापासून आपण क्वारंटाईन,सोशल डिस्टन्स या शब्दांसह अनेक मेडीकल शब्द सर्रास वापरू लागतो आहोत, त्यापैकीच एक म्हणजे पल्स ऑक्सिमीटर. तर,चला जाणून घेऊयात पल्स ऑक्सिमीटर (Pulse Oximeter)काय असतो ते.

पल्स ऑक्सीमीटर काय आहे?

पल्स ऑक्सिमीटर हे एक असं डिव्हाईस आहे जे शरीरातील ऑक्सिजनची सॅचुरेशन लेव्हल (oxygen saturation level)मोजण्यात आपल्याचा मदत करते. आरोग्य विभाग होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना वेळोवेळी त्यांची ऑक्सिजन लेव्हल विचारतो. जर एखाद्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असेल तर त्यांना वेळेवर रुग्णालयात पोहचवता येते. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पल्स ऑक्सिमीटरची मागणी वाढली आहे. आता तर बाजारात ऑक्सिमीटरचा तुटवडा भासत आहे. पल्स ऑक्सिमीटरमुळे लाल रक्तपेशी (RBCs)किती ऑक्सिजन वाहून नेत आहेत,याबद्दल माहिती मिळते. याला पीपीओ म्हणजेच पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर असेही म्हणतात. रुग्णाला अतिरिक्त ऑक्सिजनची गरज आहे की नाही,याबद्दलची माहिती डॉक्टर,नर्स किंवा आरोग्य कर्मचाऱ्याला या डिव्हाईसच्या मदतीने मिळते.

हे डिव्हाईस कसं काम करतं?

पल्स ऑक्सिमीटर ऑन केल्यावर त्यात एक लाईट दिसतो. ऑक्सिमीटर तो लाईट आपल्या त्वचेवर सोडतो आणि ब्लड सेल्सचे रंग आणि त्यांची हालचाल डिटेक्ट करतो. आपल्या ज्या ब्लड सेल्समध्ये ऑक्सिजनची पातळी बरोबर असते त्या चमकणाऱ्या लाल रंगात दिसतात. तर,उर्वरित भाग हा गडद लाल रंगाचा दिसतो. योग्य ऑक्सिजन पातळी असलेले ब्लड आणि गडद रंगाचे ब्लड सेल्स यांच्यातील फरकाच्या आधारेच ऑक्सिमीटर डिव्हाईस ऑक्सिजन सॅचुरेशनला टक्केवारीत मोजतो आणि डिस्प्लेवर रीडिंग दाखवतो.

ऑक्सिजन लेव्हल किती असावे?

डिव्हाईस96टक्क्यांपेक्षा जास्त रीडिंग देत असेल तर याचा अर्थ आहे की चार टक्के रक्तपेशींमध्ये ऑक्सिजन नाही. या डिव्हाईसमुळे रुग्णाचे रक्त घेण्याची गरज भासत नाही. मात्र,याचा वापर करण्याआधी रक्तात ऑक्सिजनची पातळी किती असावी,हे माहिती असणे गरजेचे आहे. तसेच निरोगी व्यक्तिच्या शरीरातील रक्तात ऑक्सिजन सॅचुरेशन लेव्हल95ते100टक्क्यांच्या दरम्यान असते.

95टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन पातळी असल्यास संबंधित व्यक्तीच्या फुफ्फुसांमध्ये त्रास असू शकतो. तर,ऑक्सिजनची पातळी जर93टक्क्यांपेक्षा कमी झाली तर रुग्णाला लगेच रुग्णालयात न्यावे. कारण त्याच्या शरीरातील आठ टक्के रक्तपेशींमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह होत नसतो. अशा पद्धतीने तुम्ही ऑक्सिमीटरचा प्राथमिक पातळीवर वापर करू शकता.

First published: April 20, 2021, 1:59 PM IST

ताज्या बातम्या