मराठी बातम्या /बातम्या /Viral /

विमानप्रवासातच प्रवाशाचा मृत्यू झाल्यास काय केलं जातं? कशी असते नेमकी प्रक्रिया?

विमानप्रवासातच प्रवाशाचा मृत्यू झाल्यास काय केलं जातं? कशी असते नेमकी प्रक्रिया?

प्रवास करताना येणाऱ्या संकटांपैकी एक म्हणजे प्रवासादरम्यान येणारी मेडिकल इमर्जन्सी. प्रवासातच काही जणांचा मृत्यू होण्याचेही प्रसंग घडतात.

प्रवास करताना येणाऱ्या संकटांपैकी एक म्हणजे प्रवासादरम्यान येणारी मेडिकल इमर्जन्सी. प्रवासातच काही जणांचा मृत्यू होण्याचेही प्रसंग घडतात.

प्रवास करताना येणाऱ्या संकटांपैकी एक म्हणजे प्रवासादरम्यान येणारी मेडिकल इमर्जन्सी. प्रवासातच काही जणांचा मृत्यू होण्याचेही प्रसंग घडतात.

     मुंबई, 16 ऑगस्ट-   प्रवास करताना येणाऱ्या संकटांपैकी एक म्हणजे प्रवासादरम्यान येणारी मेडिकल इमर्जन्सी. प्रवासातच काही जणांचा मृत्यू होण्याचेही प्रसंग घडतात. रेल्वे किंवा इतर वाहनांतून प्रवास करताना कोणाचा मृत्यू झाल्यास संबंधित वाहनं थांबवता येतात; मात्र विमानप्रवासात कोणाचा मृत्यू झाल्यास तसं करता येत नाही. आजवर विमानात मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. अशा प्रसंगी काय करता येतं त्याची कल्पना सर्वसामान्यांना नसते. त्याची माहिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. एका एअर होस्टेसनं हा व्हिडिओ तयार केलाय. आतापर्यंत व्हिडिओला 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. शीना मारी नावाच्या एका 25 वर्षांच्या फ्लाइट अटेंडंटनं  नुकताच एक व्हिडिओ तयार केलाय. विमानप्रवासात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास काय नियम असतात हे तिनं यात समजावून सांगितलं आहे. एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा संशय आल्यास फ्लाइट अटेंडंट तिथे जाऊन त्या व्यक्तीची नाडी तपासतात. त्यावरून मृत्यू झाल्याचं निदान झालं, तर विमानाच्या मागच्या बाजूला जागा असल्यास तिथे मृतदेह ठेवला जातो. विमानातल्या सर्व सीट्स भरलेल्या असतील, तर मृतदेह सीटवरच ठेवला जातो. अशा वेळी मृतदेह कापडात गुंडाळून ठेवला जातो व सुरक्षेसाठी सीटबेल्टही बांधले जातात. प्रवाशाच्या मृत्यूबाबत संभ्रम असल्यास किंवा त्याच्या जगण्याची काही शक्यता असल्यास विमानात कोणी वैद्यकीय अधिकारी आहे का हे तपासलं जातं. विमानात डॉक्टर असेल, तर त्यांना तिथे बोलावून त्यांच्याकडून तपासणी करून घेतली जाते, असं शीना यांनी व्हिडिओत सांगितलं आहे. गरज पडल्यास शस्त्रक्रियादेखील करता येऊ शकते, इतकं साहित्य विमानात उपलब्ध असतं. त्यानंतर वैमानिकाला या परिस्थितीबद्दल सांगितलं जातं. मग वैमानिक त्या एअरलाइन्ससाठी उपलब्ध असलेल्या ऑन कॉल डॉक्टर्सशी संपर्क साधतात व फ्लाइटमध्ये कोणी डॉक्टर नसल्यास क्रू मेंबर्सना परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. फ्लाइट अटेंडंट डॉक्टर्स नसतात. त्यामुळे त्यांना कोणाला मृत घोषित करण्याचा अधिकार नसतो, असं शीनानं या व्हिडिओत म्हटलंय. (हे वाचा:'14 ऑगस्ट रोजी हाहाकार माजणार, बळी जाणार', Time Traveller चा भयावह दावा ) प्रवाशाचा मृत्यू झाल्याच्या कारणामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याची आवश्यकता नसते. तसंच विमानाचा मार्ग बदलण्याचीही आवश्यकता नसते. याबाबत वैमानिकाला अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असतो. एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि डॉक्टरांशी चर्चा करून वैमानिक निर्णय घेऊ शकतो. अर्थात असे मृत्यू दुर्मीळ असतात. व्यावसायिक फ्लाइट्समध्ये मृत्यू होण्याची घटना फारशी घडत नाही. 600 विमान उड्डाणांमध्ये एखादी मेडिकल इमर्जन्सी होते किंवा 10 लाख प्रवाशांमध्ये 16 मेडिकल इमर्जन्सी घडतात, असं ग्लोबल रेस्क्यूचे असोसिएट मेडिकल डायरेक्टर डॉ. क्लॉडिया झेगन्स यांनी Conde Nast Traveler शी बोलताना सांगितलं. प्रवासादरम्यान मृत्यू झाल्यास प्रत्येक एअरलाइनचे याबाबतचे नियम वेगवेगळे आहेत; मात्र आपण तीन एअरलाइन्समध्ये काम केलं आहे. त्या तिन्हीमध्ये सर्वसाधारण एकसारखेच नियम होते, असंही शीनानं सांगितलंय. सगळे प्रवासी उतरल्यावरच डॉक्टर्सना बोलावून मृतदेहाची तपासणी केली जाते, असंही तिनं या व्हिडिओत म्हटलं आहे. (हे वाचा:Shocking! आकाशातून थेट माणसाच्या डोक्यावर; विमानाच्या खतरनाक लँडिंगचा VIDEO VIRAL ) IATA चे नियम काय आहेत? 'इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन'चे (IATA) याबाबत काही नियम आहेत. त्यानुसार, प्रवासी जगण्याची काही शक्यता असल्यास क्रू मेंबर्सपैकी कोणी प्रवाशाला CPR देऊ शकतो. जोपर्यंत प्रवासी श्वास घ्यायला लागत नाही किंवा वैद्यकीय मदत मिळत नाही, तोपर्यंत तो देता येतो. या नियमांनुसार, एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास वैमानिकाला कळवावं लागतं. त्याचं कारण वैमानिकाला लँडिंग स्टेशनला पुढची तयारी करण्यासाठी सूचना द्यावी लागते. मृतदेह कमीत कमी प्रवासी असतील अशा ठिकाणी हलविणं गरजेचं असतं किंवा जागा उपलब्ध नसल्यास तो सीटवरच ठेवला जावा असे हे नियम सांगतात. मृतदेह बॅगमध्ये ठेवला जावा किंवा मानेपर्यंत कापडात गुंडाळला जावा. डोळे बंद करून सीट बेल्टने बांधला जावा, असंही नियमांमध्ये सांगितलंय.
    First published:

    Tags: Video viral, Viral news

    पुढील बातम्या