चक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO

चक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO

विशेष म्हणजे या नदीत मगरींचा वावर असतो. अशा स्थितीत मुक्त विहार करताना हा देवमासा आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

  • Share this:

सिडनी, 22 सप्टेंबर : एका देवमाशाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून विशेष म्हणजे हा मासा कुठल्याही समुद्रात नव्हे तर नदीत असल्याचा हा व्हिडीओ आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहणारे आश्चर्य व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलियातील ईस्ट अलिगेटर नदीतील हा व्हिडीओ आहे.

विशेष म्हणजे या नदीत मगरींचा वावर असतो. अशा स्थितीत मुक्त विहार करताना हा देवमासा आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. ऑस्ट्रेलियातील काकडू या राष्ट्रीय उद्यानाने या या देवमाशाचा व्हिडीओ अपलोड केला आहे. सामान्यपणे देवमासा केवळ समुद्रात आढळतो. पण तो या नदीत दिसल्यावर आश्चर्य वाटलं आणि तिथं मगरी असल्याने देवमासा संकटात आहे असं सर्वांना वाटत होतं. पण या देवमाशाने परतीचा प्रवास सुरू . हा मासा अंटार्क्टिक समुद्राच्या दिशेने जात असल्याचे उद्यानाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वाचा-धरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO

वाचा-अजगराला अत्यंत क्रुरपणे गोळ्या घालून मारलं; VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

सीएनएन वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार (हम्पबॅक व्हेल) देवमासा प्रथमच नदीत आढळला. अशा स्थितीत त्याच्यावर सर्वांचे बारकाईने लक्ष होते. नंतर त्याचं दर्शन झालं नव्हतं त्यामुळे त्याच्यासोबत नेमके काय झाले असेल, या चिंतेत उद्यान प्रशासन होते. मात्र, हा मासा पुन्हा निदर्शनास आला.

वाचा-बापरे! कोळ्यानं जिवंत चिमणीला गिळलं, पुढे काय झालं पाहा VIDEO

दरम्यान, असे मोठे मासा सहसा नद्यांमध्ये पाहणे दुर्मिळ असते, मात्र, त्यांना आवश्यक असलेले अन्न शोधण्यासाठी ते कदाचित नदीत येऊ शकतात असं मत अनेक संशोधकांनी व्यक्त केलं आहे. आता हा मासा पूर्णत: सुरक्षित आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 22, 2020, 6:16 PM IST

ताज्या बातम्या