कोलकाता, 08 सप्टेंबर : बऱ्याचदा चोरीच्या अशा काही घटना समोर येतात की, ही चोरी चोरच संस्मरणीय बनवताच. अशीच एक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. इथं एका चोरट्याने 45 हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरून नेला मात्र त्याला तो मोबाईल वापरला आला नाही म्हणून त्यानं फोनच परत केला.
पीटीआयच्या वृत्तानुसार, हे प्रकरण पश्चिम बंगालच्या बर्धमान जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी सांगितले की, 4 सप्टेंबर रोजी पूर्व वर्धमान जिल्ह्यातील जमालपूर येथील मिठाईच्या दुकानातून एका व्यक्तीने 45 हजारांचा मोबाईल फोन चोरला. एका 22 वर्षीय व्यक्तीने फोन चोरला.
वाचा-चिकन सूप प्यायल्यानंतर महिलेचा पोटात झाला स्फोट आणि...
यानंतर फोन मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी फोन शोधण्याआधीच या चोरानेच फोन परत केला. काही दिवसांनी चोरट्याने दुकानातून फोन चोरला खरा मात्र त्याला तो फोन वापरताच आला नाही. म्हणून त्याने मालकाला फोन परत केला. फोन मालकाने रविवारी त्याच्या फोनवर कॉल केला असता, चोराने उचलला आणि म्हणाला की मला हा मोबाईल फोन कसा चालवायचा हे माहित नसल्यामुळे परत करायचा आहे.
वाचा-VIDEO : हत्तीला आला राग म्हणून सोंडेनं उचलली सायकल; तरुणाचा थोडक्यात वाचला जीव
त्याक्षणी फोनचा मालक स्वतः गेला आणि चोरच्या घरून त्याचा मोबाइल परत घेतला. यावेळी पोलिसही हजर होते. फोन मालकाच्या विनंतीनुसार, फोन चोरी करणाऱ्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral