लॉकडाऊनमध्ये सकाळी फिरायला निघाले; पोलिसांनी घाम गळेपर्यंत घेतला व्यायाम, पाहा VIDEO

लॉकडाऊनमध्ये सकाळी फिरायला निघाले; पोलिसांनी घाम गळेपर्यंत घेतला व्यायाम, पाहा VIDEO

लॉकडाऊन असतानाही लोक घराबाहेर जात असल्याने पोलिसांनी हे पाऊल उचललं.

  • Share this:

हरियाणा, 4 मे : कोरोना व्हायरस (Coronavirus) ची रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन (Lockdown) लावण्यात आला आहे. हरियाणामध्ये (Haryana) 10 मेपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. सरकारनेदेखील लोकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र काही लोक असेही आहेत, जे नियमांचं वारंवार उल्लंघन करीत आहेत.

हरियाणामधील (Haryana) अंबालात (Amabala) लॉकडाउन असतानाही लोक सकाळी-सकाळी फिरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडले. त्यानंतर पोलिसांनी एकेकाला पकडून त्यांची चांगलीच एक्सरसाइज घेतली. (Police Punished People Who Were Found Violating Lockdown) शेवटी पोलिसांनी शेवटची वॉर्निंग देऊन सोडून दिलं. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ जलद गतीने व्हायरल झाला आहे. (Viral Video)

हे ही वाचा-केंद्राचा मोठा निर्णय; Oxygen कंटेनरमध्ये GPS ट्रॅकिंग डिव्हाईस लावणं अनिवार्य

न्यूज एजन्सी एएनआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की, पोलीस नियम तोडणाऱ्यांना उठा-बशा काढायला लावत आहे. लॉकडाऊन असतानाही लोक घराबाहेर जात असल्याने पोलिसांनी हे पाऊल उचललं. शेवटी पोलिसांनी त्यांना चेतावणी देऊन सोडून दिलं. हरियाणा सरकारने राज्यात 3 मे पासून एक आठवड्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली आहे. मंत्री अनिल विज यांनी ट्वीटरच्या माध्यनातून याबाबत माहिती दिली. यापूर्वी कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या वाढत असल्याकारणाने ग्रुरुग्राम सह हरियाणाच्या 9 जिल्ह्यात 30 एप्रिल रोजी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. हा विकेंड लॉकडाऊन शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी सकाळपर्यंत राहणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 4, 2021, 9:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या