Home /News /viral /

लग्नादिवशीच दिसला वधूचा ब्रुस ली अवतार! रिसेप्शन पार्टी सोडून रस्त्यावर घातला राडा, VIDEO VIRAL

लग्नादिवशीच दिसला वधूचा ब्रुस ली अवतार! रिसेप्शन पार्टी सोडून रस्त्यावर घातला राडा, VIDEO VIRAL

या व्हिडीओमध्ये चक्क लग्नाच्या कपड्यांमध्ये एक वधू अज्ञात व्यक्तींशी मारामारी करताना दिसत आहे.

  वेल्स, 10 सप्टेंबर : लग्न म्हटलं की अर्थात डोळ्यासमोर नटून बसलेली वधू दिसते. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. कारण या व्हिडीओमध्ये चक्क लग्नाच्या कपड्यांमध्ये एक वधू अज्ञात व्यक्तींशी मारामारी करताना दिसत आहे. फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, ही घटना साऊथ वेल्सच्या स्वानसी येथील रग्बी क्लबमध्ये घडली. या व्हिडीओमध्ये वधू पांढऱ्या रंगाच्या वेडिंग गाऊनमध्ये दिसत आहे. शुक्रवारी तिने डेव्हिड नावाच्या व्यक्तीशी लग्न केले होते, लग्नानंतर लगेचच ती मारामारी करताना दिसली. या मारामारीचा व्हिडीओ रविवारी रेडिटवर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडीओ लगेचच व्हायरल झाला. द सनने दिलेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय डेलीमोर नावाच्या वधूनं असा दावा केला आहे की तिला कोणी मारले नाही आणि तिनेही कोणावर हात उचलला नाही. ती फक्त दोन गटांमध्ये होणारा वाद सोडवत होती. वाचा-वडिलांनी गिफ्ट दिलेल्या Whiskey च्या बाटल्या विकून तरुणाने घेतलं घर
  Nothing like a good old punch up to end your wedding day. from r/trashy
  वाचा-अरे देवा! खाजवता खाजवता गुप्तांगात घुसला बिअरचा ग्लास डेलीमोरने सांगितले की, "आम्ही तिथून निघण्याचा निर्णय घेतला, कारण मी दहा मिनिटांच्या अंतरावर पेलेन रग्बी क्लबमध्ये रिसेप्शन पार्टी केली होती. जेव्हा आम्ही रिसेप्शनला जात होतो तेव्हा क्लबच्या बाहेर दोन गटांमध्ये भांडण सुरू होते. मला माझा खास दिवस खराब करण्याची इच्छा नव्हती, म्हणून मी त्यांना शांत राहण्यास सांगितले". या व्हायरल व्हिडीओमध्ये वधू जमिनीवर पडलेली दिसत आहे. वाचा-बाप रे! पूल तुटल्यानं नदीच्या मध्यभागी अडकला बिबट्या, पुढे काय झालं पाहा VIDEO व्हिडीओच्या सुरूवातीस जमिनीवर एक महिला बेशुद्धही पडलेली दिसत आहे. याबाबत विचारले असता डेलीमोर म्हणाली की, ही मैत्रीण असून नशा केल्यामुळे ती जमिनीवर पडली होती. या जोडप्याने त्यांच्या रिसेप्शनचे आयोजन केलेल्या रग्बी क्लबमध्ये हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एक निवेदनही प्रसिद्ध केले.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Video viral

  पुढील बातम्या