Home /News /viral /

पोट दुखेल पण हसू आवरणार नाही; कधीच पाहिला नसेल इतका जबरदस्त Fashion Show Video

पोट दुखेल पण हसू आवरणार नाही; कधीच पाहिला नसेल इतका जबरदस्त Fashion Show Video

एका व्यक्तीच्या फॅशन शोने बड्याबड्या फॅशन डिझाइनर्सना आणि मॉडेल्सनाही फेल केलं आहे.

    मुंबई, 30 जून :  तुम्ही बरेच फॅशन शो पाहिले असतील. ज्यात मॉडल रॅम्प वॉकवर डिझाइनर कपडे घालून कॅटवॉक करताना दिसतात. पण फॅशन शो पाहायला आकर्षक वाटत असला तरी मजेशीर नसतो (Funny fashion show video). पण सध्या सोशल मीडियावर असा जबरदस्त फॅशन शो व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हाला मजा येईल. तुमचं हसूनहसून पोट दुखेल, पण हसू बिलकुल आवरणार नाही (Weirdest fashion show video). एका व्यक्तीने इतका जबरदस्त फॅशन शो केला आहे की त्याने बड्या बड्या फॅशन डिझाइनर्सना आणि मॉडल्सनाही टक्कर दिली आहे. त्याच्या फॅशन शोची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. @DoctorAjayita ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एका बड्या फॅशन डिझायनरला महागड्या फॅशन शोवर जितके व्ह्युज मिळाले असतील कदाचित त्यापेक्षा जास्त व्ह्युज या स्वस्त, टिकाऊ आणि टॅलेंटेड डिझाइनर आणि मॉडेलला मिळाले आहेत. या दिवसात सर्वात जास्त फॅशन शो असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. हे वाचा - बापरे! दोरीवरून 2 डोंगर पार करण्याचा तरुणाने केला प्रयत्न शेवटी...; काळीज घट्ट करून पाहा हा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहिलं तर एखाद्या छोट्याशा वस्तीतील, गल्लीबोळातील हे ठिकाण आहे. त्यानंतर एक व्यक्ती कपडे घालावेत तशी तुटलेली खुर्ची, पत्रा जिना, गेट, दरवाजा, पलंग हे सर्व घालून रॅम्प वॉक करताना दिसते. या सर्व वस्तू भंगारातील आहेत पण या व्यक्तीने त्या अशा पद्धतीने कॅरी केल्या आहेत जणू काही डिझाइनर ड्रेसच वाटावा. त्याचे प्रॉप्स स्वस्त आहेत पण हायक्लास फॅशन शोमध्ये असावेत तसेच आहेत. त्यातही विशेष म्हणजे मॉडेल्स आणि ड्रेस डिझाइनर्सची स्टाइल लक्षात घेतली आहे आणि ती हुबेहूब कॉपी केली आहे. अगदी मॉडलप्रमाणे गंभीर चेहरा आणि कॅटवॉक करत तो चालताना दिसतो. त्याच्याकडे महागडे प्रॉप्स नाहीत, रॅम्प नाही पण तरी  रॅम्पशिवायच जबरदस्त रॅम्प वॉक केला आहे. किंबहुना बड्याबड्या डिझाइनर्सना, मॉडल्सना त्याने फेल केलं आहे. हे वाचा - Flying Hotel : भविष्यातील हवेत उडणारं हॉटेल! काय असू शकतात 'या' हॉटेलची वैशिष्ट्ये व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू येईल. पण त्याच्या टॅलेंटचं कौतुक केल्याशिवायही तुम्ही राहणार नाही. माहितीनुसार हा तरुण एक सरकारी कर्मचारी आहे. उत्तर प्रदेशच्या नगरपालिकेत तो काम करतो. असे मजेशीर व्हिडीओ तो बनवत असतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Fashion, Funny video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या