निखिल मित्रा/ 02 मार्च, रायपूर : देशभऱात वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत. अशाच एका परंपरेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात चक्क चिखलाने वऱ्हाड्यांचं स्वागत केलं जातं आहे. सामान्यपणे वरात दारात आली की फूलांचा वर्षाव करून, फटाके फोडून वरातीचं स्वागत होतं. पण इथं मात्र स्वागतासाठी चिखल वापरला जातो. आता ही विचित्र परंपरा कुठली आहे ते पाहुयात.
छत्तीसगढच्या अम्बिकापूरजवळ अशी लग्न होतात. मॅनपाटमधील मांझी समाजाची ही प्रथा. जिथं अशा वेगळ्या पद्धतीने वरातीचं स्वागत होतं. जेव्हा नवऱ्याकडील मंडळी वरात घेऊन नवरीच्या दारात येतात तेव्हा वधूपक्षाकडील लोक चिखलात नाचून वरातीचं स्वागत करतात. वरात दारात आली की बँडबाजा वाजतो आणि वधूपक्षाकडील सर्व लोक चिखलतात नाचतात.
धक्कादायक! लग्नानंतर अतिघाई नवरदेवाच्या जीवावर बेतली, लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मृत्यू
यासाठी ते खास वेशभूषा करतात. कुणी माकड बनतं, तर कुणी इतर प्राणी. वेगवेगळ्या प्राण्यांचे ते आवाजही काढतात. हा डान्स तोपर्यंत सुरू असतो जोपर्यंत ते थकत नाही. जो शेवटपर्यंत नाचतो तो जिंकतो आणि त्यालाच सर्वात आधी वरातीचं स्वागत करायला दिलं जातं.
असं विचित्र पद्धतीने स्वागत करण्याची ही परंपरा बऱ्याच काळापासून सुरू आहे. पूर्वजांच्या या परंपरेचं सर्व जण अजूनही पालन करतात. इतर समाजातील लोकही ही प्रथा पाहण्यासाठी वधूच्या घरी गर्दी करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Viral, Wedding, Wedding video