मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तुम्हीही स्वीकारा चॅलेंज अन् उच्चारुन दाखवा रेल्वे स्टेशनचं नाव! आतापर्यंत सगळे झालेत फेल

तुम्हीही स्वीकारा चॅलेंज अन् उच्चारुन दाखवा रेल्वे स्टेशनचं नाव! आतापर्यंत सगळे झालेत फेल

Indian Railways: तुम्ही WhatsApp वर देखील पाहू शकता ट्रेनचं लाइव्ह स्टेटस, समजून घ्या सोपी प्रोसेस

Indian Railways: तुम्ही WhatsApp वर देखील पाहू शकता ट्रेनचं लाइव्ह स्टेटस, समजून घ्या सोपी प्रोसेस

न्यूझीलंडमध्ये एक स्टेशन आहे, ज्याचे नाव उच्चारणे अशक्य आहे. यात एकूण 85 अक्षर असून त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. स्थानिक भाषेत लोक याला टोमेटा किंवा टोमेटा हिल म्हणतात.

उत्तर आयर्लंड, 9 जुलै : जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी त्यांच्या खास वैशिष्ट्यामुळे ओळखली जातात. यामध्ये रेल्वे स्थानकांचाही (Railway Stations) समावेश होतो. जगात विचित्र नावं (Weird Name) असलेली अनेक रेल्वेस्थानकं आहेत. त्यांची नावं वाचताना आपल्याला बऱ्याचदा हसू आवरत नाही. विचित्र नावं असलेली रेल्वेस्थानकं ही त्या भागाची ओळख असते. उत्तर आयर्लंडमधलं (North Ireland) एक रेल्वेस्थानक असंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या रेल्वे स्थानकाचं नाव (Name) इतकं विचित्र आहे, की त्याचा उच्चार करताना माणूस अक्षरशः थकून जातो. विशेष म्हणजे या नावातून त्याचा अर्थदेखील स्पष्ट होत नाही आणि उच्चारही पूर्णपणे करता येत नाही. स्थानिक नागरिक या ठिकाणाला टॉमेटा हिल (Tomata Hill) असं म्हणतात; पण तेदेखील स्थानकाचं मूळ नाव कसं उच्चारत असतील, हा प्रश्न कायम राहतो. `एशियानेट न्यूज डॉट कॉम`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

TAUMATAWHAKATANGIHANGAKOAUAUOTAMATEATURIPUKAKAPIKI-MAUNGAHORONUKUPOKAIWHENUAKITNATAHU असं अत्यंत अनोखं नाव असेललं रेल्वेस्थानक न्यूझीलंडच्या उत्तर आयलंडमध्ये आहे. या रेल्वेस्थानकाचं नाव 85 अक्षरांचं आहे. त्यामुळे त्याचा सहजासहजी उच्चार करणं केवळ अशक्य आहे. तसंच या नावाचा उच्चार अद्याप कोणीही केलेला नाही. हे नाव ठेवण्यामागं नेमकं काय कारण असावं, हे अद्याप समजलेलं नाही. तसंच या नावाचा अर्थदेखील अद्याप कळलेला नाही. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे या रेल्वेस्थानकाच्या नावामागे एक महत्त्वपूर्ण अर्थ आहे. एका पराक्रमी योद्ध्याच्या नावावरून हे नाव रेल्वेस्थानकाला दिलं गेलं आहे. स्थानिक नागरिक हे नाव कसं उच्चारतात हा संशोधनाचा विषय ठरु शकतो; पण स्थानिक नागरिक या ठिकाणाला टॉमेटा किंवा टॉमेटा हिल असं म्हणतात.

GF ने आपली किडनी देऊन BF ला वाचवलं; ठिक होताच त्याने तिच्या हृदयावर केला वार

अनोख्या नावामुळे हे रेल्वे स्थानक कायम प्रसिद्धीझोतात असतं. विशेष म्हणजे, खास नावामुळे या रेल्वे स्थानकाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) झाली आहे.

एकूणच इतक्या मोठ्या नावाचा उच्चार स्थानिक नागरिक कसा करत असतील हा जसा संशोधनाचा भाग आहे, तसंच प्रवासी या ठिकाणी जाण्यासाठी नाव कसं उच्चारत असतील किंवा काय सांगत असतील हादेखील प्रश्नच आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जाण्याचा विचार किंवा नियोजन करत असाल तर सर्वप्रथम हे नाव नीट वाचून त्याचा उच्चार करून बघा. अन्यथा ऐन वेळी तुमचा गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

First published:

Tags: Viral