Home /News /viral /

कॅमेऱ्यासमोरच तरुणींनी एकमेकींना कानशिलात लगावल्या; कारण जाणून व्हाल थक्क, VIDEO

कॅमेऱ्यासमोरच तरुणींनी एकमेकींना कानशिलात लगावल्या; कारण जाणून व्हाल थक्क, VIDEO

दोघीही एकमेकींना अगदी जोरात कानशिलात लगावण्याचं चॅलेंज स्वीकारत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर दोघीही एकमेकींना एकापाठोपाठ अनेक चापटी मारतात

  नवी दिल्ली 29 मे : तुम्ही आजपर्यंत अनेक विचित्र चॅलेंज (Weird Challenge) आणि खेळ पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला असा एक खेळ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नक्कीच तुम्ही असा खेळ याआधी कधीच पाहिला नसेल. हा खेळ असा आहे की, पाहूनच तुम्ही डोक्याला हात लावाल. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन मुली अतिशय अजब खेळ खेळताना दिसल्या (Slapping Game Video). VIDEO : भूकंप येताच जीव धोक्यात घालून अपंग मित्राला वाचवायला गेले विद्यार्थी; शेवटी काय झालं पाहा याआधी तुम्ही कदाचितच एकमेकांना चापट लगावण्याचा असा अजब खेळ खेळला किंवा पाहिला असेल. लहानपणी कदाचित मस्ती म्हणून काही लोकांनी असा खेळ खेळला असू शकतो, मात्र मोठं झाल्यावर कोणी असा खेळ खेळल्याचं तुम्ही नक्कीच पाहिलं नसेल. जर मोठं झाल्यावरही कोणी असा खेळ खेळत असेल तर त्याला नक्कीच लोक वेडाच म्हणतील. कारण मार खाण्याची इच्छा कोणाला असते?
  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुली हा विचित्र गेम खेळताना दिसत आहेत. दोघीही एकमेकींना अगदी जोरात कानशिलात लगावण्याचं चॅलेंज स्वीकारत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर दोघीही एकमेकींना एकापाठोपाठ अनेक चापटी मारतात. पहिली मुलगी दुसर्‍या मुलीला चापट मारते तेव्हा ती अतिशय जोरात लागते, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. यानंतर दोघीही एकमेकींना मारू लागतात. VIDEO: मनाविरुद्ध लग्न लावल्याचा राग? नवरीने नवरदेवासोबत स्टेजवरच केलं असं काही की सगळेच शॉक व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, यानंतरही दोघीही मागे हटण्याचं नाव घेत नाहीत आणि एकमेकांना चोप देत राहतात. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दोन हसणाऱ्या मुली दिसतील. दोघीही एकमेकांसमोर उभ्या राहतात आणि बघता बघता एकमेकींना चापट मारायला लागतात. दोघीही खूप आनंदाने एकमेकांना मारताना दिसतात. only._.sarcasm_ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Funny video, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या