मराठी बातम्या /बातम्या /Viral /भीतीदायक घरांमध्ये झोपण्याची अजब नोकरी; प्रत्येक मिनिटासाठी मिळणारा पगार ऐकून चक्रावून जाल

भीतीदायक घरांमध्ये झोपण्याची अजब नोकरी; प्रत्येक मिनिटासाठी मिळणारा पगार ऐकून चक्रावून जाल

हॉन्टेड हाऊस टेस्टर्सची नोकरी सोपी नसते. आपला जीव धोक्यात घालून त्यांना या घरांमध्ये राहावं लागतं. ही घरं अनेक वर्षांपासून वापरात नसतात

हॉन्टेड हाऊस टेस्टर्सची नोकरी सोपी नसते. आपला जीव धोक्यात घालून त्यांना या घरांमध्ये राहावं लागतं. ही घरं अनेक वर्षांपासून वापरात नसतात

हॉन्टेड हाऊस टेस्टर्सची नोकरी सोपी नसते. आपला जीव धोक्यात घालून त्यांना या घरांमध्ये राहावं लागतं. ही घरं अनेक वर्षांपासून वापरात नसतात

नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : एखाद्याला नवं घर खरेदी करायचं असेल मात्र तिथे भूत-प्रेत असल्याच्या गोष्टी समजताच व्यक्ती ते घर घेणं टाळतात. आपल्या देशात असं असल्यास पूजा-पाठ करून उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र चीनमध्ये यासाठी लोकांना नोकरी दिली जाते (Most Risky Jobs). ही नोकरी करणाऱ्यांना एक रात्र अशा भीतीदायक घरांमध्ये झोपावं लागतं (Haunted House Testers) आणि हे सिद्ध करून दाखवावं लागतं, की खरंच इथे असं काहीही नाही.

हे ऐकून तुम्हालाही अजब वाटलं असेल मात्र चीनच्या प्रॉपर्टी बिझनेसमध्ये ही काही नवीन बाब नाही. इथल्या रिअल इस्टेट एजन्सी हॉन्टेड हाऊस टेस्टर्सच्या नोकरीसाठी (China Haunted House Testers Job) भरपूर पगार देतात. भीतीदायक प्रॉपर्टी बाजारात विकण्यासाठी आणि लोकांना मनवण्यासाठी हे लोक अशा घरांमध्ये झोपण्यासाठी लोक शोधतात.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हॉन्टेड हाऊस टेस्टर्सची नोकरी सोपी नसते. आपला जीव धोक्यात घालून त्यांना या घरांमध्ये राहावं लागतं. ही घरं अनेक वर्षांपासून वापरात नसतात. या घरांबद्दल भीतीदायक आणि भुताचे किस्से ऐकूनही त्यांना हे सिद्ध करावं लागतं, की इथे असं काहीच नाही. या नोकरीसाठी त्यांना प्रत्येक मिनिटाच्या हिशेबाने पगार दिला जातो. एका मिनिटासाठी या लोकांना ७०० रुपये दिले जातात. एखादा व्यक्ती चोवीस तास अशा घरात थांबला तर त्याला 16,744 रुपये दिले जातात.

अनेकदा बंद घरांमध्ये प्रॉपर्टी इनव्हेस्टर्स आणि घराचे मालकही जाण्यास इच्छुक नसतात. अशात ते होम टेस्टर्सची मागणी करतात. रिअल इस्टेट एजंट्सच्या माध्यमातून यासाठी प्रोफेशनल लोक शोधले जातात. या लोकांना भीतीदायक घरांमध्ये राहण्याचा अनुभव असतो. 24 तास याठिकाणी काढल्यानंतर ते आपल्या ग्राहकांना या गोष्टीची व्हिडिओच्या माध्यमातून खात्री पटवून देतात की इथे राहण्यात काहीच अडचण नाही. बहुतेक लोक पार्ट टाईम जॉब म्हणून ही नोकरी करतात.

First published:
top videos

    Tags: China, Viral news