Home /News /viral /

हा डान्स करतोय की परेड? लग्नाच्या वरातीतील Viral Video पाहून पोट धरून हसाल

हा डान्स करतोय की परेड? लग्नाच्या वरातीतील Viral Video पाहून पोट धरून हसाल

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ढोलाच्या तालावर नाचत आहे, पण याला नक्की डान्स म्हणायचं की आणखी काही, हा मोठा प्रश्न आहे.

    नवी दिल्ली 22 एप्रिल : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे लग्नातील डान्सचे एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. यात काही लोक असा मजेशीर डान्स करतात की तो पाहून सगळेच थक्क होतात तर काही लोकांचा डान्स असा असतो की हा डान्स नेमका काय आहे, हेच कोणाला समजत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ (Wedding Dance Video) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लग्नाच्या वरातीत विचित्र डान्स (Weird Dance) करताना दिसत आहे. अरे यार Girlfriend सोबत असं कोणता Boyfriend करतो? VIDEO चा शेवट पाहून तुम्हीही हादराल वरातीत केला जाणारा नागिन डान्स सर्वात प्रसिद्ध आहे, ज्यावर लोक अक्षरशः जमिनीवर लोळून डान्स (Nagin Dance Video) करतात. हरियाणवी गाण्यांवरही लोकांच्या मस्तीचे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. तर काही लोक ढोलाच्या तालावरही ठेका धरतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ढोलाच्या तालावर नाचत आहे, पण याला नक्की डान्स म्हणायचं की आणखी काही, हा मोठा प्रश्न आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वरातीत गर्दीपासून दूर जाऊन नाचत आहे. 29 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती ढोल-ताशांच्या तालावर नाचण्याऐवजी परेड आणि पीटी करताना दिसत आहे. तो कधी सॅल्युट मारतो तर कधी उभा राहून व्यायाम करायला लागतो. त्याचे डान्स स्टेप्स इतके मजेशीर आहेत की व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्यक्तीचा डान्स पाहून आजूबाजूला उभे असलेले लोकही गोंधळलेले दिसतात. त्यांना समजत नाही की हा नेमका काय डान्स आहे? लय भारी! चिमुकल्याचा हा जबरदस्त VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही नाचल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ आयपीएस दीपांशू काबरा (@ipskabra) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं - 'ट्रेनिंग संपताच जवान मित्राच्या मिरवणुकीत पोहोचला.' या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच लोक व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं की, या प्रकारच्या डान्समुळे आरोग्य सुधारेल आणि शिस्तही दिसेल. दुसर्‍या युजरने विनोद केला की, जर कोणी सावधान बोललं असतं तर हा डान्स थांबला असता.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Dance video, Wedding video

    पुढील बातम्या