मराठी बातम्या /बातम्या /Viral /

डिझायनर कारची सवारी आणि पेट्रोलचीही गरज नाही, पठ्ठ्याने केला सॉलिड जुगाड; पाहा VIDEO

डिझायनर कारची सवारी आणि पेट्रोलचीही गरज नाही, पठ्ठ्याने केला सॉलिड जुगाड; पाहा VIDEO

आपल्याला पेट्रोलचा खर्च येणार नाही आणि प्रवाशांनाही कारमध्ये फिरण्याचा आनंद घेता येईल, यासाठी पठ्ठ्याने सॉलिड शक्कल लढवली आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 04 ऑक्टोबर : पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol diesel price) किती तरी वाढल्या आहेत. वाहनचालकांच्या खिशाला हा खर्च परवडणारा नाही (Petrol diesel price hike). त्यामुळे काही जणांनी आपल्या गाड्या सोडून सार्वजनिक गाड्यांचा पर्याय निवडला. पण एका पठ्ठ्याने तर जुगाडच केला (Desi jugaad video). त्याने अशी गाडी तयार केली ज्यामुळे कारमध्ये सवारीचा आनंदही मिळेल आणि पेट्रोलही लागणार नाही .

काही वेळा काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर असतात. अशावेळी जुगाड कामी येतो (Bullock cart car video). भारतात तशी जुगाडाची कमी नाही. सोशल मीडियावर देशी जुगाडाचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीतही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो नेटिझन्सना खूप आवडतो आहे.

आपल्याला पेट्रोलचा खर्च येणार नाही आणि प्रवाशांनाही कारमध्ये फिरण्याचा आनंद घेता येईल, यासाठी पठ्ठ्याने सॉलिड शक्कल लढवली आहे.

हे वाचा - Shocking video - पक्ष्याने धडक देताच पेटलं विमान; प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या

व्हिडीओत पाहू शकता एक डिझायनर कार दिसते आहे. कारजवळ काही महिला उभ्या आहे. समोरच्यांना बाय बाय करत निरोप घेत या महिला त्या कारमध्ये बसतात. एकेएक करत तीन महिला कारमध्ये बसतात आणि मग कारचा दरवाजा बंद करतात. तोपर्यंक कारचा फक्त मागील भाग दिसतो. त्यावरील डिझायनही भन्नाट आहे. अशा डिझाइनर कारमध्ये कुणाला बरं फिरायला आवडणार नाही. त्यानंतर कॅमेरा  हळूहळू गाडीच्या पुढच्या दिशेल जातो.

अरेच्चा हे काय कारच्या पुढे चक्क दोन बैल. म्हणजे ही कार कार नाही तर बैलगाडी कार आहे. या व्यक्तीन कारचा मागील भाग बैलगाडीला जोडला आहे. त्यामुळे ती मागून पाहिली तर कारच वाटते. त्यानंतर बैल ही कार ओढत नेतात.

हे वाचा - बापरे! इवल्याशा चिमुकल्याचा जबरदस्त स्टंट; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

chokhapunjab इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. गरज आविष्काराची जनननी आहे म्हणतात. तसं आता पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे खिशावर परिणाम झाला आहे. त्यावर मात करण्यासाछी हा समाधानकारक असा मार्ग आहे. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Car, Viral, Viral videos