मराठी बातम्या /बातम्या /Viral /रसगुल्ला दिसताच मोह आवरेना; नवरदेवाने स्टेजवरच केलं असं काही की नवरीही चक्रावली..VIDEO

रसगुल्ला दिसताच मोह आवरेना; नवरदेवाने स्टेजवरच केलं असं काही की नवरीही चक्रावली..VIDEO

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

लग्नाच्या वेळी लोकांची नजर वधू-वरावरच असते. म्हणजे या दोघांच्या प्रत्येक हालचाली पाहुणे अगदी बारकाईने पाहत असतात. परंतु कधीकधी वधू आणि वर पूर्णपणे वेगळ्याच मूडमध्ये असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 20 मार्च : लग्नाचा सीझन असो वा नसो, परंतु इंटरनेट नेहमीच लग्नाच्या व्हिडिओंनी भरलेलं असतं. यूजर्सही नवरी आणि नवरदेवाचे व्हिडिओ मोठ्या आवडीने पाहतात. यात कधी वधू किंवा तिच्या कुटुंबातील सदस्य असं काही करतात ज्यामुळे हे प्रकरण चर्चेचा विषय बनतं, तर कधी वराचा व्हिडिओ व्हायरल होतो. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेट चर्चेचा विषय बनला आहे. ज्यात वराचा स्वॅग आणि अॅटिट्यूड पाहण्यासारखा आहे.

विवाह सुरू असतानाच नवरदेवाच्या मित्राचं नवरीसोबत विचित्र कृत्य; भडकलेल्या वधूने लग्नच मोडलं

लग्नाच्या वेळी लोकांची नजर वधू-वरावरच असते. म्हणजे या दोघांच्या प्रत्येक हालचाली पाहुणे अगदी बारकाईने पाहत असतात. परंतु कधीकधी वधू आणि वर पूर्णपणे वेगळ्याच मूडमध्ये असतात. त्यामुळे अनेकदा ते असं काही करतात. ज्यामुळे कधी त्यांची प्रशंसा केली जाते, तर कधी त्यांची खिल्लीही उडवली जाते. आता हा व्हिडिओ तुम्हीच बघा, जिथे स्टेजवर उभ्या असलेल्या वधूसमोर वराने असं काही केलं. जे पाहून तुम्हीही खळखळून हसाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर स्टेजवर उभे राहून विधी करत आहेत. त्याचवेळी त्यांच्यासमोर रसगुल्ल्याचं ताटं येतं. जिथे वधू-वरांना एकमेकांना रसगुल्ला खाऊ घालावा लागतो. पण असं काही होत नाही! त्यापेक्षा इथे वर आधी स्वतः रसगुल्ला खातो आणि मग सोबत उभ्या असलेल्या मित्राला रसगुल्ला खाऊ घालतो. बिचारी नवरी त्याला तिथे उभी राहून बघत राहते आणि नंतर तिलाही हसू आवरत नाही.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर funtaap नावाच्या अकाउंटवरुन शेअर केला आहे. वृत्त लिहिपर्यंत ३६०० हून अधिक लाईक्स आले असून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया कमेंट करून दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'वधूसोबत असं कृत्य कोण करतो, भाऊ.' तर दुसऱ्या यूजरनं लिहिलं की, 'वराची ही वृत्ती अजिबात चांगली नाही.' याशिवाय इतर अनेक यूजर्सनी यावर कमेंट केली.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Wedding