मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चालकानं कारमधील लोकांना मृत्यूच्या दाढेतून परत आणलं; अपघाताचा VIDEO पाहून येईल अंगावर काटा

चालकानं कारमधील लोकांना मृत्यूच्या दाढेतून परत आणलं; अपघाताचा VIDEO पाहून येईल अंगावर काटा

सध्या सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. मात्र, सुदैवानं कार चालकाच्या सतर्कतेमुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 01 ऑगस्ट : रस्त्यावर कारनं फिरणं सर्वांनाच आवडतं. मात्र, अनेकदा रस्त्यावर अशा काही दुर्घटना (Road Accident) घडतात ज्यात अनेकांना जीव गमवावा लागतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. मात्र, सुदैवानं कार चालकाच्या सतर्कतेमुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बापरे हे काय!या मुलीसोबत फ्रंट सीटवर बसतो जंगली अस्वल,लाँग ड्राईव्हचा घेतात आनंद

सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होणाऱ्या या अपघाताच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हायवे वर अगदी वेगात गाड्या जात आहेत. मात्र, इतक्यात काही गाड्या फ्लायओव्हरच्या आधीच काही कारणामुळे थांबतात. यानंतर अगदी वेगात मागून एक ट्रक येताना दिसतो. मात्र, कार चालकानं सतर्कता दाखवत वेळीच गाडी बाजूला घेतल्यानं मोठी दुर्घटना टळली.

VIDEO: छताला लटकताना दिसलं महिलेचं डोकं; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन

चालकानं सतर्कता दाखवली नसती तर कारमध्ये बसलेल्या सर्व लोकांचा जीव धोक्यात आला असता. या व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल की कशा प्रकारे चालकानं सर्वांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी ट्रक चालकाच्या चुकीबाबत संताप व्यक्त केला आहे. एका यूजरनं म्हटलं, की अशा लोकांमुळे अनेक कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. तर, आणखी एकानं म्हटलं की अशा लोकांविरोधात कडक कारवाई करायला हवी. अनेकांनी असंही म्हटलं, की ट्रक आणि कार चालक या दोघांच्याही सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सोशल मीडियावर विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ (Weird Accident Video) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Road accident, Shocking video viral