Home /News /viral /

उतावळा नवरा अन्... हळदीतच नवरदेवाने केला नको तो हट्ट, पाहुणेही पाहत बसले; VIDEO VIRAL

उतावळा नवरा अन्... हळदीतच नवरदेवाने केला नको तो हट्ट, पाहुणेही पाहत बसले; VIDEO VIRAL

लग्नाआधी नवरदेवाने महिलांकडे केली भलतीच मागणी.

    मुंबई, 24 सप्टेंबर :  उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग, ही म्हण आपल्याला माहितीच आहे. साहजिकच आपलं लग्न (Wedding Video) होणार याचा आनंद प्रत्येकाला असतोच. पण काही जणांच्या आनंदाला बिलकुल पारावर राहत नाही (Bride Groom Video). आपल्या या आनंदात, उत्साहात ते असं काही करता की इतरांसाठी ते शॉकिंग असतं. अशाच एका नवरदेवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतो आहे. लग्नासाठी उतावळा असलेला हा नवरा हळदीतच (Haldi ceremony video) असा हट्ट करतो की हळदीला आलेले पाहुणेही पाहत राहतात. हळद लावणाऱ्या महिलेकडून नवरदेवाने भलतीच मागणी केली आणि महत्त्वाचं म्हणजे त्या महिलेनेही त्याची इच्छा पूर्ण केली. जे पाहून पाहुणेही थक्क झाले. व्हि़डीओत पाहू शकता हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. नवरदेवाला हळद लावली जाते आहे. नवरदेव खूप आनंदात दिसतो आहे. हळद लावतानाच तो एक मागणीही करतो. हे वाचा - लग्नाआधी नवरीने सांगितली आपली 'दिल की बात'; VIDEO पाहून नेटिझन्सही झाले इमोशनल नवरदेवाला एक महिला हळद लावते. ती नवऱ्याच्या पूर्ण चेहऱ्यावर अगदी हळुवारपणे हळद लावते आणि तिथून बाजूला होत असते, जेणेकरून इतर महिला नवरदेवाला हळद लावतील. पण नवरदेव तिला थांबवतो आणि पुच्ची मागतो. पुच्ची म्हणजे किस. हळद लावणाऱ्या प्रत्येक महिलेकडून हा नवरदेवर किस मागतो आहे. नवरदेवाला हळद लावणारी महिलासुद्धा नवरदेवाची इच्छा पूर्ण करताना दिसते. ती नवरदेवाच्या हळद लावलेल्या चेहऱ्यावर गोड किस देते. त्यानंतर नवरदेवाच्या आनंदाला पारावर राहत नाही. तो अगदी नाचूच लागतो. आजूबाजूला असलेले त्याचे मित्रही ओरडू लागतात आणि नातेवाईक, पाहूणे हसू लागतात. हे वाचा - VIDEO - भाओजीच्या नकळत मेहुणीने मारला चान्स; जबरदस्त प्लॅनिंग पाहून नवरदेव हैराण आय डोंट से चीज नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos, Wedding video

    पुढील बातम्या