मुंबई, 08 मार्च : लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहेत. ज्यात नवरदेव भरमंडपात वधूपक्षाशी हुज्जत घालताना दिसला. पण तरी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप होण्याऐवजी उलट लोक या नवरदेवाचं कौतुक करत आहेत.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-नवरी शेजारी शेजारी बसले आहेत. लग्नाच्या विधी सुरू आहेत. इतक्यात नवरीची बहीण नवऱ्याजवळ येते. तिच्या हातात गिफ्ट आहे जी ती नवरदेवाला देते आहे. नवरदेव तिच्यावर मोठमोठ्याने ओरडताना दिसतो आहे. मी आधीच सांगितलं होतं, मी नाही घेणार असं तो तिला म्हणतो. नवरीची बहीण त्याला पुन्हा पुन्हा विनवणी करते. पण नवरदेव तिचं बिलकुल ऐकत नाही. तो रागात तिला नाही म्हणतो. शेवटी नवरीची बहीण नाराज होऊन गप्पपणे तिथून निघून जाते.
'पापा की परी'ने वाजवला बाबाच्या लग्नाचा 'बँड'; 10 वर्षीय लेकीमुळे बापाला नेलं पोलीस ठाण्यात
आता नवरदेव वधूपक्षावर राग काढत असेल तर संताप होणं साहजिकच आहे. पण या नवरदेवाचं कौतुक होतं आहे, त्याने जे केलं ते योग्य केलं असं म्हटलं जातं आहे. व्हिडीओ पाहिल्यावर त्यावर तशाच प्रतिक्रिया उमटत आहेत. आता असं का ते प्रत्यक्षात तुम्ही व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही समजेल.
नवरीच्या बहिणीशी हुज्जत घातल्यानंतर व्हिडीओच्या शेवटी नवरदेव नवरीबाईला मिठी मारतो आणि हेच माझं गिफ्ट आहे, असं म्हणतो. त्यानंतर सर्वांचे चेहरे खुलतात.
धक्कादायक! लग्नानंतर अतिघाई नवरदेवाच्या जीवावर बेतली, लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मृत्यू
एरवी हुंड्यासाठी, महागड्या गिफ्टसाठी वधूपक्षाला, नवरदेवाला भांडताना, लग्न मोडताना तुम्ही पाहिलं असेल. पण इथं मात्र उलटं आहे. वधू पक्षाकडील मंडळी गिफ्ट देत असूनही नवरदेव त्याला स्वतःहून नकार देतो आहे. त्यामुळे त्याची अशी हुज्जत कौतुकास्पदच आहे.
View this post on Instagram
तुम्हाला नवरदेवाचं हे वागणं कसं वाटलं? तुम्हाला असं कुणी गिफ्ट दिलं तर तुम्ही काय कराल? किंवा तुमच्या लग्नातील किंवा इतर कुणाच्या लग्नातील असा किस्सा तुमच्याकडेही असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Bridegroom, Viral, Viral videos, Wedding, Wedding video