मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लॉकडाऊनमध्ये लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; दुकानाचं शटर उघडताच पोलिसांनी धू धू धुतलं, पाहा VIDEO

लॉकडाऊनमध्ये लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; दुकानाचं शटर उघडताच पोलिसांनी धू धू धुतलं, पाहा VIDEO

लॉकडाऊनमध्ये लग्नखरेदीसाठी दुकानात गर्दी करण्यात आली होती. पोलिसांनी शटर उघडताच आरडाओरडा करत मुली बाहेर पडल्या.

लॉकडाऊनमध्ये लग्नखरेदीसाठी दुकानात गर्दी करण्यात आली होती. पोलिसांनी शटर उघडताच आरडाओरडा करत मुली बाहेर पडल्या.

लॉकडाऊनमध्ये लग्नखरेदीसाठी दुकानात गर्दी करण्यात आली होती. पोलिसांनी शटर उघडताच आरडाओरडा करत मुली बाहेर पडल्या.

  • Published by:  Meenal Gangurde

मध्य प्रदेश, 9 मे : देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ राज्य सरकारांवर आली आहे. असे असले तरी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नियमांचं उल्लंघन सुरूच आहे. लॉकडाऊनच्या काळात लग्नसमारंंभाना काही ब्रेक लागला नाही. अनेक ठिकाणी लग्नसमारंभ होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी लपून-छपून लग्नाची खरेदीही सुरू असल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळालं आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील दतिया या भागातील आहे. या भागात लपून-छपून शटर बंद करुन लग्नाची खरेदी सुरू होती. येथील पोलिसांनी याचा शोध सुरू होता. दरम्यान जसं पोलिसांनी शटर उघडलं तर दुकानातून एक तरुण व काही महिला व मुली आरडा-ओरडा करीत बाहेर पडल्या. लॉकडाऊनमध्ये दुकानं खुली करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र असं असतानाही बेकायदेशीरपणे लपून-छपून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या तरुणाची चांगलीच धुलाई केली. तो तरुण मात्र पोलिसांची माफी मागत होता. मात्र पोलिसांनी त्याचं अजिबात एकलं नाही आणि कॉलरला पकडून त्याला तेथून घेऊन गेले.

हे ही वाचा-गोशाळेत उघडलं कोरोना सेंटर, रुग्णांना दिली जातायंत दूध-गोमुत्रापासून बनलेली औषधं

देशात सलग तिसऱ्या दिवशी 24 तासात चार लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशात 04,01,078 रुग्णांची नोंद झाली. याअगोदर पाच मे रोजी 4.12 लाख आणि 6 मे रोजी 4.14 लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मृतांची आकडेवारी वाढतच असून देशात गेल्या 24 तासात पहिल्यांदाच 4,187 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दिलासादायक बाब म्हणजे 03,18,609 रुग्ण कोरोनातून बरेही झाले आहेत.

First published:

Tags: Corona spread, Lockdown, Madhya pradesh, Video viral