MPSC ची जाहिरात नाही ही तर लग्नाची निमंत्रण पत्रिका!

MPSC ची जाहिरात नाही ही तर लग्नाची निमंत्रण पत्रिका!

सरकारी नोकरभरतीच्या जाहिरातीच्या भाषेत ही लग्नाची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आकर्षक निमंत्रण पत्रिका देण्याकडे अनेकांचा कल असतो. निमंत्रण पत्रिकेत काहीतरी हटके असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्याचेही खास ट्रेंडही येतात. पर्यावरणपूरक लग्नपत्रिका, हस्तलिखित टाइप किंवा अगदी जुन्या पद्धतीने चिठ्ठी लिहिल्यासारख्या पत्रिका असतात. महिन्याभरापूर्वी अशीच पर्यावरणपूरक निमंत्रण पत्रिका छापली होती. एका कुंडीत एक छानसं रोपटं आणि त्या कुंडीच्या चारही बाजुला मजकूर अशी निमंत्रण पत्रिका होती. त्यानंतर आता एका सरकारी कर्मचाऱ्याने छापलेल्या लग्नपत्रिकेची चर्चा सर्वत्र होत आहे.

खरंतर जेव्हा ही लग्नपत्रिका पाहतो तेव्हा सुरुवातील ती एखाद्या सरकारी नोकरीची जाहिरात असल्यासारखं वाटतं. आतापर्यंत लग्नाचं असं निमंत्रण कुठल्याच सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तीने दिलेलं नाही. लग्नाची ही निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी ही लग्नाची निंमंत्रण पत्रिका आहे हे माहिती असूनही एमपीएससीची जाहिरात असल्यासारखंच वाटल्याचं म्हटलं आहे.

निमंत्रण पत्रिकेत लग्नासाठी पत्नी या पदाची जाहिरात दिली आहे. मात्र या पदावरील उमेदवार निश्चित झाला असून लवकरच नियुक्ती असल्याचं नमूद केलं आहे. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांना भरतीची जाहिरात पाहिली की अभ्यास करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळते. त्यामुळे अशा जाहिरातीबद्दल अभ्यास करणाऱ्या मुलांचे प्रेम थोडं जास्तीच असतं. त्यामुळेच या अनोख्या निमंत्रण पत्रिकेची चर्चा रंगली आहे.

कांदेपोहे कार्यक्रम, साखरपुडा या कार्यक्रमांना मुलाखत आणि पूर्वपरीक्षा असं संबोधलं आहे. त्याशिवाय लग्नाला येताना पाहुण्यांना कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही याठिकाणी बायोमेट्रिक पडताळणी करण्यात येणार नाही असंही म्हटलं आहे. विवाह समारंभाचे ठिकाण म्हणजे परीक्षा केंद्र आहे असं म्हटलं आहे. या परीक्षा केंद्राच्या परिसरात आहेर आणण्यास किंवा त्या परीक्षार्थींना म्हणजेच पती-पत्नीला देण्यास सक्त मनाई असल्याचंही म्हटलं आहे. विवाहाच्या या आगळ्या वेगळ्या निमंत्रणाची चर्चा सध्या रंगली आहे.

वाचा : लग्नाच्या निमंत्रणासाठी या तरुणांनी लढवली अशी भन्नाट आयडिया

First published: February 17, 2020, 6:26 PM IST
Tags: wedding

ताज्या बातम्या