नवी दिल्ली, 25 जानेवारी : आपल्या मुला-मुलीसाठी चांगला जोडीदार शोधण्यासाठी आई-वडिलांना मोठी मेहनत घ्यावी लागत होती. पण आता मॅट्रिमोनियल साईट, इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात हा त्रास वाचला आहे. पण सध्या सोशल मीडियावर लग्नासाठी एका अनोख्या वराचा (Groom) फोटो व्हायरल होत आहे.
लग्नासाठी व्हायरल होणारा हा फोटो कोणत्या मुला-मुलीच्या नाही, तर एका कुत्र्याचा (Dog Groom) आहे. कुत्र्याची मालकीण त्याच्यासाठी वधूच्या शोधात आहे. केरळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या कुत्र्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्यासाठी कोणी दुल्हन असल्यास, सांगण्याचं म्हटलं आहे.
पोस्ट केलेल्या फोटोमध्ये कुत्र्याला पारंपरिक लुंगी आणि एक गुलाबी रंगाचं शर्ट घातलं आहे. कुत्रा आपल्या मालकीणीच्या मदतीने दोन पायांवर उभा असलेला दिसतोय. दुसऱ्या फोटोमध्ये कुत्र्याला केळीच्या पानावर जेवण दिलं असून त्यासमोर तो बसल्याचं दिसतंय.
Tbh only reason I’m still on Facebook is for Indian dog parents groups! So EXTRA. Never disappoints pic.twitter.com/wCo0LkcCyT
— Damini Shrivastava (@DammitDamini) January 22, 2021
सोशल मीडियावर ही पोस्ट केवळ व्हायरल झाली नाही, तर त्यावर प्रतिक्रियाही आली आहे.
My girl is here, she’s from #Kashmir pic.twitter.com/BOFT9aGlbP
— Bisma (@ali_tenzu) January 22, 2021
एका Bisma @ali_tenzu ट्विटर युजरने आपल्या फीमेल कुत्र्यासोबतचा फोटो पोस्ट करत, ती काश्मीरमधून असल्याचं सांगितलं आहे. या कुत्र्याचे लुंगी-शर्ट घातलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.