Surprise romantic Gift असावं तर असं! नवऱ्याला बर्थ डे सरप्राइज देणाऱ्या बायकोचा VIDEO तुफान VIRAL

Surprise romantic Gift असावं तर असं! नवऱ्याला बर्थ डे सरप्राइज देणाऱ्या बायकोचा VIDEO तुफान VIRAL

सेलेब्रिटींच्या गिफ्टची चर्चा नेहमी होत असते. पण सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय या सामान्य नवरा- बायकोचा व्हिडिओ. 80 लाखांवर लोकांनी तो आतापर्यंत पाहिला आहे.

  • Share this:

कोलकाता : आपल्या प्रेमाच्या माणसानं सरप्राइज गिफ्ट देऊन सुखद धक्का द्यावा, अशी अनेकांची इच्छा असू शकते. जेव्हा गिफ्ट खरोखर स्पेशल असतं तेव्हा ते देणाऱ्या आणि मिळालेल्या दोघांच्या चेहऱ्यावरचे बदलत जाणारे भाव बघण्यासारखे असतात. सरप्राइज गिफ्टची उदाहरणं फोटोंच्या किंवा व्हिडिओच्या स्वरूपात अनेकदा पाहिली असतील. सेलेब्रिटींच्या गिफ्टची चर्चा नेहमी होत असते. पण सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय एक व्हिडिओ. बायकोनं नवऱ्याला दिलेलं सरप्राइज birthday gift चा एक साधासा पण गोड व्हिडिओ आहे हा. एका बंगाली जोडप्याचं निखळ प्रेम यातून दिसतं. बायको नवऱ्याचे डोळे बंद करून त्याला एका खोलीत नेते आणि...शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहाच.

या व्हिडिओत दिसणारे नवरा- बायको कुणी सेलेब्रिटी नाहीत. अगदी घरातल्या कपड्यांतच ते या व्हिडिओ वावरताना दिसतात. बायकोनं नवऱ्यासाठी अख्खी खोली यात दिसते. पार्श्वभूमीला रोमँटिंक गाणं वाजत असतं. कँडललाइटनी सजवलेलं हार्ट, गुलाबाची फुलं अशी सगळी जय्यद तयारी यात दिसेल. अनपेक्षित रोमँटिक भेट आपल्याला मिळाल्यानंतर नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे आहेत. या व्हिडिओचे 79 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत आणि देशभर हा व्हिडिओ शेअर होतो आहे.

-----------------------------------

अन्य बातम्या

देशात हुकूमशाही चालणार नाही, प्रियंका गांधींचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

भाजप नगरसेवकांनी तुडवला राहुल गांधींचा फोटो, दिल्या 'शेम शेम'च्या घोषणा

लग्नानंतर पहिल्यांदाच साई दर्शनाला आलेल्या राणी मुखर्जीला अश्रू अनावर

First published: December 16, 2019, 7:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading