Elec-widget

पॅराग्लायडिंग- 'लँड करा दो...' Part 2: व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

पॅराग्लायडिंग- 'लँड करा दो...' Part 2: व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

हा संवाद ऐकल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल.

  • Share this:

धर्मशाळा, 19 नोव्हेंबर: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पॅराग्लायडिंगचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होता. त्या व्हिडिओमुळे विपिन साहू हा तरुण फेमस झाला होता. पॅराग्लायडिंग करताना विपिनने दिलेल्या रिअ‍ॅक्शनवर लोक पोट धरून हसत होते. असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.पहिल्या व्हिडिओमध्ये पॅराग्लायडिंग लवकरात लवकर लँड करण्यासाठी विपिन आग्रह करत होता. तसेच या व्हिडिओ संबंधित तरुण ट्रेनरला चक्क हवा कमी करण्यास सांगतोय.

या व्हिडिओतील तरुणाचे नाव पवन असल्याचे सांगितल जातय. तो पहिल्यांदाच पॅराग्लायडिंग करतोय. पवनने दिलेल्या रिअ‍ॅक्शनची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 7 मिनिटे 29 सेंकदाचा हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथे शुट केला आहे. व्हिडिओ पवन वारंवार पॅराग्लायडिंग ट्रेनरला खाला उतरवण्यास सांगत आहे. ट्रेनर पवनला शांत करण्याचा प्रयत्न करतोय पण घाबरलेला पवन काही केल्या ऐकण्यास तयार नाही. घाबरलेला पवन एका क्षणी चक्क हवा कमी करण्यास सांगतो. यावर ट्रेनर आता मी हवा कशी काय कमी करू असा प्रश्न विचारतो. पॅराग्लायडिंग करत असताना पवन ट्रेनरशी जो संवाद करतो तो ऐकल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल.

हवा कमी करण्यासाठी पवन चक्क ट्रेनरला बलूनमधील होल करून हवा कमी करण्यास सांगतो. त्यावर ट्रेनर म्हणतो की, जर होल केला तर आपण सरळ खाली जाऊ आणि मरू. युट्यूबवर हा व्हिडिओ 14 नोव्हेंबर रोजी अपलोड करण्यात आला होता. आतापर्यंत 18 हजारहून अधिक वेळा पाहिला केला आहे. या व्हिडिओवर युझर्स भन्नाट प्रतिक्रिया देखील देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2019 04:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...