मुंबई, 1 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) एका मुलीचा व्हिडीओ जलद गतीने व्हायरल (Viral Video) होत आहे. सर्वांच्याच आयुष्यात नोकरी लागणं हा क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो. शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना विचारा नोकरीचं महत्त्व...मुलाखतीच्या शेवटी जेव्हा मुलाखतकार 'तूझी निवड झाली आहे'..हे शब्द उच्चारतो तेव्हा सर्व काही आनंददायी होऊ जातं. जणू काही आपण आनंदयात्री असल्यासारखे वाटायला लागतं.
असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नोकरी मिळाल्यानंतर ऑफिसच्या बाहेर आल्यानंतर ही तरुणी चक्क (Girl Dance After Getting Job) नाचायला लागते. तिची मजेशीर प्रतिक्रिया लोकांना खूप आवडत आहे. ऑफिसच्या बाहेर लावलेल्या एका सीसीटीवी कॅमऱ्यात (Caught On CCTV Camera) हा व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे. हा व्हिडीओ त्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने शेअर केला आहे. या तरुणीची प्रतिक्रिया पाहून तुमच्या चेहऱ्यावर पण स्मित हास्य उभं राहिल.
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम युजर @dakara_spence द्वारा शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिलं आहे की - मी या तरुणीची नोकरीसाठी निवड केली. पाहा बाहेर येऊन तिची प्रतिक्रिया कशी होती. व्हिडीओमध्ये मुलगी पार्किंगमध्ये उभी राहून डान्स करीत आहे.
हे ही वाचा-बोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO
ती कार्यालयातून बाहेर येते आणि पार्किंगच्या इथे उभी राहते. आजूबाजूला पाहते आणि नाचायला लागते. काही सेकंद डान्स केल्यानंतर ती शांतपणे निघून जाते. तिची आनंद व्यक्त करण्याची पद्धत लोकांना खूप भावली आहे. हा व्हिडीओ 30 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला असून आतापर्यंत याला 5 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोबत 5 लाख कमेंट्स आणि हजारो शेअर्स मिळाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.