मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चिमुकल्यांनी केला World Record; 800 कोटी वेळा पाहिला गेलेला हा VIDEO तुम्ही बघितला का?

चिमुकल्यांनी केला World Record; 800 कोटी वेळा पाहिला गेलेला हा VIDEO तुम्ही बघितला का?

या व्हिडिओचं नाव आहे बेबी शार्क डान्स (Baby Shark Dance). हा व्हिडिओ यूट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेला आहे.

या व्हिडिओचं नाव आहे बेबी शार्क डान्स (Baby Shark Dance). हा व्हिडिओ यूट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेला आहे.

या व्हिडिओचं नाव आहे बेबी शार्क डान्स (Baby Shark Dance). हा व्हिडिओ यूट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेला आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 06 जून: सध्या सोशल (Social Media) मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरसोबतच यूट्यूबचेही भरपूर फॉलोवर्स आहेत. केवळ कलाकारच नाही तर अनेक सामान्य लोकांनीही यूट्यूबच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्धी मिळवली आहे. आजकाल तर लहान मुलंही यूट्यूबवरुन अनेक नवनवीन गोष्टी शिकत असतात. यूट्यूबवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओची (Most Viewed Video On YouTube) कथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत यूट्यूबवर अनेक असे व्हिडिओ आहेत, ज्यांना लाखो-करोडो व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा व्हिडिओबाबत सांगत आहोत, जो 800 करोडहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ केवळ 2 मिनिट 16 सेकंदाचा आहे. मात्र, व्हिडिओला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. हा व्हिडिओ Pingfong नावाच्या अकाउंटवरुन शेअर केला गेला आहे. सर्वसामान्यांसारखा रस्ता ओलांडत होता तरुण; 23 सेंकदाच्या VIDEO नंतर ठरला हिरो या व्हिडिओचं नाव आहे बेबी शार्क डान्स (Baby Shark Dance). हा व्हिडिओ यूट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेला आहे. हा एकप्रकारचा अॅनिमेटेड व्हिडिओ आहे आणि मध्ये मध्ये दोन लहान मुलं डान्स करताना दिसत आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी हा व्हिडिओ बनवला गेला आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ लहान मुलांच्या भलतेच पसंतीस पडतात. हा व्हिडिओ कलरफूल असून यात उत्तम ट्यूनसोबतच फ्लॅशी व्हिजवल्सचा वापर केला गेला आहे. लहान मुलांना यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेले Poem व्हिडिओ प्रचंड आवडतात. एमआरआय स्कॅनमध्ये गर्भाशयातील बाळे कशी दिसतात?मजेशीर VIDEO सोशल मीडियावर व्हायरल हा सॉन्ग व्हिडिओ 18 जून 2016 रोजी अपलोड करण्यात आला आहे. 5 वर्षात यावर 8,696,958,542 व्ह्यूज आले आहेत. Pinkfong द्वारे अपलोड कऱण्यात आलेल्या या व्हिडिओची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनंही (Guinness World Record) सर्वाधिक पाहिला गेलेला यूट्यूब व्हिडिओ (YouTube Video) म्हणून नोंद केली गेली आहे.
First published:

Tags: Top trending, Viral news, Viral video on social media

पुढील बातम्या