मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: साडी नेसली, ब्युटी पार्लरमधूनही जाऊन आला, पण मुलीच्या घरच्यांनी ओळखलंच आणि...

VIDEO: साडी नेसली, ब्युटी पार्लरमधूनही जाऊन आला, पण मुलीच्या घरच्यांनी ओळखलंच आणि...

एक तरुण (Boyfriend) मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी साडी नेसून गेला, घरातील पुरुष मंडळींचा त्यानं डोळा चुकवला पण महिलांनी त्याला ओळखलं.

एक तरुण (Boyfriend) मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी साडी नेसून गेला, घरातील पुरुष मंडळींचा त्यानं डोळा चुकवला पण महिलांनी त्याला ओळखलं.

एक तरुण (Boyfriend) मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी साडी नेसून गेला, घरातील पुरुष मंडळींचा त्यानं डोळा चुकवला पण महिलांनी त्याला ओळखलं.

  • Published by:  News18 Desk
भदोही, 2 जून : गर्लफ्रेंडशी (Girlfriend) भेटण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या जातात. तिला भेटण्यासाठी काहीही करण्याची तयारी असते. मात्र, अनेकदा या प्रकारांमुळे मुलांना अडचणींचा सामना करावा लागतो. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एक तरुण (Boyfriend) मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी साडी नेसून गेला, घरातील पुरुष मंडळींचा त्यानं डोळा चुकवला पण महिलांनी त्याला ओळखलं. एक तरुण त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क साडी नेसून गेला. त्याच्या प्रेयसीच्या घराबाहेर चहापत्ती विकली जायची. तेथे बाहेर बरेच लोक होते, मात्र साडी नेसल्यामुळं आणि डोक्यावरून पदर तोंडापर्यंत असल्यामुळं त्याला कोणीही ओळखलं नाही. बाहेर लोकांना कोणीतरी महिला असल्याचं समजून त्यांनी त्याला घरात जाण्यापासून रोखलं नाही. मात्र, घरात गेल्यानंतर महिलांसमोर मात्र त्याची चांगलीच अडचण झाली. त्याच्याशी बोलताना महिलांना हा स्त्रीयांच्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न करतोय असं वाटलं. शंका आल्यामुळं त्यांनी तोंडावरील पदर बाजूला घेण्यास सांगितला. मात्र, तो पदर बाजूला घेण्यास तयार नव्हता. त्यामुळं महिलांचा संशय आणखीनच वाढला आणि त्यांनी घराबाहेर असलेल्या पुरुष मंडळींना आवाज दिला. घरात काहीतरी गडबड झाल्याचं पाहून ते लगेच तिथं उपस्थित झाले. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशमधील भदोहीच्या सोनखरी गावातील आहे. त्यांनी घरात येवून पाहिलं असता सर्वांचा गोंधळ उडाला. सर्वांनी पदर बाजूला करायला लावल्यानंतर त्याचा खरा चेहरा पाहून सर्वजण संतप्त झाले. साडी नेसून पूर्ण महिलांसारखा मेकअप केलेला आणि हातात बांगड्यादेखील घातल्या होत्या. मात्र, घरात येऊन त्यानं आपली फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर मग पुरुष मंडळींनी त्याची चांगलीच धुलाई केली. भरपूर मार दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचं ठरवलं. इतक्यात काही लोकांनी मध्यस्थी करून त्याला घराबाहेर आणलं. त्याचे काही मित्र बाहेर गाडी घेऊन थांबलेच होते, याचा फायदा घेऊन तो तिथून निसटला आणि मित्रांच्या गाडीवर बसून पसार झाला.
First published:

Tags: Boyfriend, Girlfriend, Uttar pradesh news

पुढील बातम्या