आईसलॅण्डमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक; लोकं लाव्हा रसावर शिजवतायत अन्न; VIRAL VIDEO

आईसलॅण्डमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक; लोकं लाव्हा रसावर शिजवतायत अन्न; VIRAL VIDEO

सुमारे 800 वर्षे सुप्तावस्थेत असलेला दक्षिण-पश्चिमी आईसलॅण्डमधील (Iceland) रिक्झाव्हेक द्वीपकल्पातील ज्वालामुखीचा (Volcano) गेल्या शुक्रवारी उद्रेक झाला. यामुळे आईसलॅण्ड मध्ये शेकडो लहान–मोठे भुकंपाचे धक्के जाणवले.

  • Share this:

रिक्झा व्हेक, आईसलॅण्ड : सुमारे 800 वर्षे सुप्तावस्थेत असलेला दक्षिण-पश्चिमी आईसलॅण्डमधील (Iceland) रिक्झाव्हेक द्वीपकल्पातील ज्वालामुखीचा (Volcano) गेल्या शुक्रवारी उद्रेक झाला. यामुळे आईसलॅण्ड मध्ये शेकडो लहान–मोठे भुकंपाचे धक्के जाणवले. एजाफज्लालजोकुल येथे 2010 मध्ये झालेल्या विस्फोटाच्या तुलनेत फॅग्राल्डस्फॉल (Fagradalsfjall) पर्वतावरील ज्वालामुखीचा उद्रेक हा काहीसा कमी तीव्रतेचा होता, त्यामुळे युरोपमधील हवाई रहदारी ठप्प झाली नाही. तथापि या ज्वालामुखीमुळे जमिनीतून वाहणाऱ्या लाव्हारसाची काही विस्मयकारक दृष्यं जगाला दिसली आहेत.

नैसर्गिक चमत्कारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बेटावरील हा ज्वालामुखीचा उद्रेक पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरत आहे. हे दुर्मिळ दृष्य पाहण्यासाठी हजारो आईसलॅंडर्स उद्रेक झालेल्या ठिकाणी जात असून, काही साहसी लोक यातील गरम लाव्हावर (Lava) स्वयंपाक (Cooking) करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत वैज्ञानिक उद्रेक झालेल्या ठिकाणाचा अभ्यास करताना दिसत असून, काही जण ज्वलंत भूकवचावर हॉटडॉग (Hotdog) शिजवण्याचा प्रयोग करीत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका वैज्ञानिकांच्या गटानं येथील तापमान किती उच्चांकी हे तपासण्यासाठी जमा झालेल्या पिवळ्या लाव्हावर काही सॉसेज ग्रील्ड करण्याचा निर्णय घेतला. हॉटडॉग्जसाठी ब्रेड अल्युमिनियमच्या फॉईलवर ठेवला असून सॉसेस साठी रोल शिजवण्यासाठी वितळलेल्या पृष्ठभागावर सोडल्याचे व्हिडीओत दिसत आहेत. अशा स्पॉटवर स्वयंपाक करणं फारसं नवीन नसावं. परंतु तरीदेखील ऑनलाइन युजर्सनी या व्हिडीओत दिसणाऱ्या कृतीबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच हे शिजवलेले पदार्थ पुरेसे सुरक्षित आहेत की नाही याबाबत देखील अनेकांनी साशंकता व्यक्त केली आहे.

अगदी 1 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या या व्हिडीओत ज्वालामुखीमुळे जमिनीखाली वितळलेला लाव्हा पसरत असून, त्याचबाजूला वैज्ञानिक केचपने हॉटडॉग्ज सजवत आहेत. तर काही जण एका टोकावर बसून ग्रील्ड स्नॅक खाताना दिसत आहेत. या स्थळाला भेट देणाऱ्या एका व्यक्तीनं लाव्हा रसावर अंडी आणि वाळवलेलं डुकराचं मांस शिजवण्याचा प्रयत्न केला. एरिकूर हिलमर्सने अंडी आणि खारवून वाळवलेले डुकराचे मांस शिजवण्यासाठी एक पॅन घेतला आणि तो लाव्हा रसाच्या थरावर ठेवला. त्यानं हा सर्व प्रकार शूट करीत त्याचा व्हिडीओ युटयुबवर शेअर केला. परंतु तप्त लाव्हा रसामुळे पॅन वितळला आणि हा त्याचा साहसी प्रयोग फसला.

आईसलॅण्डिक हवामान कार्यालयाच्या (IMO) म्हणण्यानुसार, या उद्रेकाचं प्रमाण अत्यल्प स्वरुपाचं असून त्यामुळे ग्रिनाडविकमधील नागरिकांना आणि पायभूत सुविधांना कोणताही धोका लगेच संभवत नाही.

First published: March 25, 2021, 11:25 PM IST

ताज्या बातम्या