मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! देवीच्या लहानशा मूर्तीला नेसवली सिल्कची सहावारी साडी, तुम्हीही पाहा हा कमाल VIDEO

OMG! देवीच्या लहानशा मूर्तीला नेसवली सिल्कची सहावारी साडी, तुम्हीही पाहा हा कमाल VIDEO

देवीला साडी नेसवण्याच्या कलेचं कौतुक वाटणाऱ्यानी हा व्हीडिओ पहा आणि यावेळी श्रावण महिन्यात आपल्या लाडक्या देवील अशीच सजावट करा.

देवीला साडी नेसवण्याच्या कलेचं कौतुक वाटणाऱ्यानी हा व्हीडिओ पहा आणि यावेळी श्रावण महिन्यात आपल्या लाडक्या देवील अशीच सजावट करा.

देवीला साडी नेसवण्याच्या कलेचं कौतुक वाटणाऱ्यानी हा व्हीडिओ पहा आणि यावेळी श्रावण महिन्यात आपल्या लाडक्या देवील अशीच सजावट करा.

नवी दिल्ली,10जुलै : आपण नेहमी मंदिरात जेव्हा देवीच्या मूर्तीला साडी नेसवलेली पाहतो. तेव्हा साडी (Saree) नेसवण्याच्या कलेचं कौतुक वाटतंच शिवाय हे कसं शक्य झालं? हा प्रश्नही पडतो. असा प्रश्न पडणाऱ्या प्रत्येकासाठी मूर्तीला साडी नेसवण्याची सोपी पद्धत (Easy Way) शिकवणारा हा व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. अनेक जणांनी कमेंट आणि शेअर केला आहे.

आता श्रावण महिन्याला सुरूवात होईल, म्हणजेच सणांची लगबग सुरू होईल. देवाची पूजा(Worship)घरी करत असलो तरी, ती साग्रसंगीत आणि मनोभावे करण्याची आपली इच्छा असते. त्यासाठी देवाच्या मूर्तीची सजावट (Decoration) मनापासून केली जाते. गौरी-गणपती, महाक्ष्मी, नवरात्र, मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार व्रतांवेळी तुम्हीसुद्धा देवीच्या मूर्तीला साडीने सजवू शकता.

(वासरापेक्षाही ठेंगणी, दीड फुटांची राणी; चर्चेत आहे ही सर्वात लहान गाय)

तुम्हाला देवीच्या मूर्तीला साडी नेसवण्याची कला शिकायची असेल तर, हा व्हीडिओ नक्की पहा. या व्हीडिओत काही क्षणात एक साडी लक्ष्मी देवीच्या मूर्तीला या पुजाऱ्याने नेसवली आहे. युट्युब आणि फेसबूकवर हा व्हीडिओ (Facebook video) पोस्ट करण्यात आला आहे.

(VIDEO: वर्क फ्रॉम होममध्ये किती तास आणि कसं काम करावं, ऐका डॉक्टरांचा सल्ला)

पिवळ्याजर्द रंगाची आणि मरून रंगाच्या काठांची ही साडी पुजारी सहजपणे नेसवत आहेत. ही देवीची मूर्ती अगदी छोटी आहे. साडीच्या मिऱ्या पाडून देवीला पद्धतशिरपणे साडी नेसवली आहे. त्यानंतर मूर्तीला फुलांची आणि दागिन्यांची सजावटही केली आहे.

" isDesktop="true" id="577559" >

सोशल मीडिया (Social Media) माहिती पोहचवण्याचा आणि फेमस होण्याचा एक सोपा मार्ग आहे. रोज सोशल मीडियावर अनेक व्हीडिओ पोस्ट होत असतात. यामधून बऱ्य़ाचवेळा उपयोगी माहिती मिळत असते. सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.

First published:

Tags: Video viral, Youtube