दोन्ही हात नसतानाही कॅरम खेळणाऱ्याचे कौशल्य पाहुन चकीत व्हाल, पाहा VIRAL VIDEO

दोन्ही हात नसतानाही कॅरम खेळणाऱ्याचे कौशल्य पाहुन चकीत व्हाल, पाहा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर अपंग असणाऱ्या तरुणाचा कॅरम खेळतानाचा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र तुम्हाला प्रेरणा मिळते

  • Share this:

मुंबई: आपल्याला देवानं दोन हात आणि पाय दिलेले असतानाही आपण आपली कामं आणि दैनंदिन कामं नीट करण्यासाठी आळस करतो. मात्र सोशल मीडियावर अपंग असणाऱ्या तरुणाचा कॅरम खेळतानाचा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र मनात प्रेरणा मिळते. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अपंग मुलाचा पायाने कॅरम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या मुलाकडे कॅरम खेळताना पाहून एक वेगळीच ऊर्जाही मिळते आणि स्वत:ला प्रश्नही विचारावासा वाटतो. काय करतोय आपण? आपल्याला इतकं सगळं देवानं दिलेलं असतानाही आपण प्रत्येक छोट्य़ा गोष्टींमध्ये खचून जातो. मात्र हा दोन्ही हात नसलेला अपंग तरुण परिस्थितीवर मात करून स्वत:लाही आणि या जगात अशक्य काही या म्हणण्यालाही त्यानं सिद्ध केलं आहे.

आमच्याकडे काय सबब आहे? या जगात # ImpossibleIsNothing अशा हॅशटॅगने फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी त्याचे आणि त्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. कमेंटबॉक्समध्ये फक्त कौतुकाचा वर्षावर केला आहे. या व्हिडिओला 7 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. 550 हून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. अपंग असूनही हा तरुण उत्तम कॅरम खेळत आहे. हे प्रेरणादायक आहे. यासारख्या व्हिडिओ ज्यांना अशा कमतरता आहेत त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे कारण ते त्यांच्या व्य़ंगावर मात करण्यासाठी आणि त्यांच्या अंतःकरणाचे अनुसरण करण्यास प्रवृत्त करते.

First published: February 20, 2020, 6:17 AM IST

ताज्या बातम्या