मुंबई, 25 फेब्रुवारी : कोरोनानंतरच्या जगात (world after corona) काम करण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या. विशेषतः ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याऐवजी 'वर्क फ्रॉम होम'ला (work from home) प्राधान्य दिलं गेलं. अनेकांना हे आवडलं तर अनेकांना नाही.
आता या 'वर्क फ्रॉम होम' संकल्पनेबाबतचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल ( viral video about work from home) झाला आहे. हा गंमतीदार व्हिडिओ (funny video about work from home) अनेकांना आवडतो आहे. यात एका मुलीनं आपल्याला ऑफिसला यायचं नसून घरून काम करण्यातच आनंद मिळतो आहे असं सांगितलं आहे.
हरजस सेठी नावाच्या मुलीचा हा व्हिडिओ (Hajras Sethi video) आहे. तिनं एक व्हिडिओ बनवत इंस्टाग्रामवर (Instagram video about work from home) आपलं दुःख एकदमच मजेदार पद्धतीनं शेअर केलं आहे. या व्हिडिओत हरजस सेठी म्हणते, की 'माझा आत्मा अगदी थरथर कापतो आहे. असं सध्यासारखं घरून काम करूनच सगळे लोक खूप आनंदात आहेत. मी कंपनीला विचारू इच्छिते, की तुमचा महसूल वाढतो आहे, ट्रान्स्पोर्टचा खर्च वाचतो आहे. सगळेजण एकदम आरामात आपले पायाजामे घालून काम करत आहेत. मी तर जीन्स वगैरे सगळं पॅक करून ठेऊन दिलं आहे. आता ऑफिसला येणं काही शक्य होणार नाही. हमसे ना हो पाएगा' (Humse na ho payega)
Biggest fear of employees working from home. Watch till the end. pic.twitter.com/Qhuj9YeT8k
— PiyushTweets (@PiyushTweets1) February 23, 2021
या व्हायरल व्हिडिओमधून घरून काम करणाऱ्या अनेक लोकांची भावना मांडली गेली आहे. त्यांना आपापल्या ऑफिसात जाऊन पूर्वीसारखं काम करावं वाटत नाही. ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना हेच वाटतं, की हे 'वर्क फ्रॉम होम' असंच सुरू राहावं. अर्थात, असे लोक बहुसंख्य आहेत ज्यांना 'वर्क फ्रॉम होम'चा कंटाळा आला आहे.
मात्र हरजसनं व्हिडिओ संपवण्यापूर्वी म्हणलं, की 'ऑफिसवाले जर माझा व्हिडिओ पाहत असतील तर कृपया मला फायर नका करू. आजकाल नोकऱ्या मिळतात कुठं?' ती पुढं सांगते, की हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी बनवला गेला आहे.
हेही वाचा VIDEO: बलकाविना अंडं? काय आहे सत्य?
या व्हिडिओला तब्बल 4 लाखांहून जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. पेटीएमचे फाउंडर असलेल्या विजय शेखर यांनीही व्हिडिओला लाईक केलं आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये भावना मांडली, की आम्हालाही अगदी असंच वाटतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Viral video., Work from home