मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अशी बिदाई कधी पाहिली नसेल; बाप-लेकीचा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

अशी बिदाई कधी पाहिली नसेल; बाप-लेकीचा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

लग्नाआधी एका बापानं आपल्या मुलीसाठी जे काही केलं ते पाहून तुमच्या डोळ्यातील अश्रू आवरणार नाहीत

लग्नाआधी एका बापानं आपल्या मुलीसाठी जे काही केलं ते पाहून तुमच्या डोळ्यातील अश्रू आवरणार नाहीत

लग्नाआधी एका बापानं आपल्या मुलीसाठी जे काही केलं ते पाहून तुमच्या डोळ्यातील अश्रू आवरणार नाहीत

    कोलकाता 08 डिसेंबर : नेहमी आईच्या (Mother) मायेचं कौतुक केलं जातं. बाप (Father) म्हणजे कठोर हृदयाचा असंच मानलं जातं. मात्र कितीही कठोर बाप का असेना आपल्या मुलीच्या बाबतीत मात्र तो खूप कोमल होतो. एरवी आयुष्यात कितीही खाचखळगे आले, कितीही संकटं आली, खांद्यावर कितीही जबाबदाऱ्यांचं ओझं असलं तरी आपल्या चेहऱ्यावरील ताण बाजूला ठेवून, आपल्या अश्रूचा आवंढा गिळून, चेहऱ्यावर सतत हसू ठेवत एक कठोरातील कठोर पुरुष आपल्या लेकीला सासरी पाठवताना मात्र हळवा होतो. सध्या असाच बापलेकीचा (father daughter) एक भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. लेकीची सासरी पाठवणी करताना लग्नाच्या शेवटचे बापलेकीचे क्षण तसे आपण बरेच पाहिले आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर बापलेकीच्या नात्याचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहुना तुम्ही त्या अश्रूंना बांध घालू शकणार नाही. या मुलीचं लग्न ठरलं आहे. लग्नाआधीच्या विधी पार पडत आहेत. त्यापैकीच हा एक विधी. यामध्ये बाप आपल्या लेकीचे दुधाने पाय धुतो आहे आणि तेच दूध स्वतः पितो आहे. व्हिडीओत पाहू शकता मुलगी खुर्चीवर बसली आहे. तिच्या पायाखाली एक ताट ठेवलं आहे. तिच्या वडीलांना आधी पाण्याने तिचे पाय धुतले, त्यानंतर दुधाने पाय धुतले. तिचे पाय धुऊन जे दूध ताटात पडलं ते त्यांनी पुन्हा वाटीत जमा केलं आणि ते स्वतः प्यायले. बापाला असं करताना पाहून लेकीला हुंदका आवरला नाही. कोणतीच लेक आपल्या वडीलांना असं पाहू शकत नाही. तिनंही आपल्या वडीलांना ते दूध पिण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र वडीलांनी तिचं एक ऐकलं नाही. त्यांनी तिला थांबवलं आणि ते दूध प्यायले. त्यानंतर पुन्हा तिचे पाय धुतले आणि एका पांढऱ्या कपड्यावर आपल्या लाडकीच्या पाऊलखुणा त्यांनी घेतल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर प्रत्येकानं इमोशनल प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
    First published:

    पुढील बातम्या