VIDEO : बापरे..! हत्तीचा प्रताप, चालता चालता बाईकवरील हेल्मेट टाकलं तोंडात; दुचाकीस्वार शॉक

VIDEO : बापरे..! हत्तीचा प्रताप, चालता चालता बाईकवरील हेल्मेट टाकलं तोंडात; दुचाकीस्वार शॉक

आपल्याच तालात निघालेल्या एका हत्तीनं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीवरील हेल्मेट आपल्या सोंडेत पकडलं आणि आणि तोंडात घातलं. हा प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला.

  • Share this:

गुवाहाटी, 12 जून : लहान मुलांसह सर्वांनाच हत्ती (Elephant) पहायला खूप आवडतो. हत्तीला पाहण्यासाठी अनेकजण प्राणी संग्रहालयाला भेट देत असतात. सध्या एका हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Elephant Viral  video) चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्याच तालात निघालेल्या एका हत्तीनं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीवरील हेल्मेट आपल्या सोंडेत पकडलं आणि आणि तोंडात घातलं. हा प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. हत्ती ते हेल्मेट तोंडात घालून तसाच पुढे निघून गेला.

आता या हत्तीनं फळ म्हणून हेल्मेट खाल्ले की, दुचाकीस्वाराची फजिती केली याबाबत चर्चा होत आहेत. मात्र अनेकांनी हत्तीने जर हेल्मेट खाल्ले असेल तर त्याच्यावर लवकरात लवकर उपचार करण्यात यावेत असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या हत्तीवर उपचार करायला हवेत असं म्हणत त्याच्या आरोग्याला हे घातक असल्याचं म्हटलं आहे.

मात्र, इकडे हत्तीनं हेल्मेट नेल्यामुळं दुचाकीस्वाराची चांगलीच पंचाईत झाली. हेल्मेट नसल्यामुळं आता आपल्याला दंड भरावा लागेल, या भीतीने दुचाकीस्वार हत्तीला हेल्मेट देण्याची विनंती करत होता. पण, हत्ती आला तसा त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला. हा सर्व प्रकार आसामच्या गुवाहाटीमध्ये घडला आहे. हे

वाचा - ‘मी जाड असो किंवा सडपातळ; पण स्वतःसाठी खास आहे’, विद्या बालननं सांगितलं यशाचं रहस्य

गुवाहाटीच्या नरेंगे लष्करी कंपाऊंड भागात जंगली हत्ती असे नेहमी येत-जात असतात. पण ते कधीही लोकांना त्रास देत नाहीत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेटपासून देखील हत्ती अगदी व्यवस्थित पुढे जाताना दिसतो. आलेला हत्ती दुचाकीस्वारांची हेल्मेट घेऊन गेल्याने त्याची फारच केविलवाणी स्थिती झाली होती.

Published by: News18 Desk
First published: June 12, 2021, 9:18 PM IST

ताज्या बातम्या