जयपूर,: साप आणि मुंगूस यांच्यातील झटापटीचे बरेच व्हिडीओ आपण पाहिले असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर (social media) साप (snake) आणि गाढव (donkey) यांच्यातील झटापटीचा व्हिडीओ व्हायरल (video viral) होतो आहे. एका गाढवाच्या तोंडात चक्क साप अडकला आहे. त्यानंतर दोघंही एकमेकांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कशी धडपड करत आहेत त्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रतापगढ जिल्ह्यातील पीपलखुंट परिसरातील ही घटना आहे. इथल्या माही नदीच्या किनाऱ्यावर मंगळवारी सकाळी एक गाढव गवत चरायला आलं. गवतात तोंड फिरवत असताना गवतात बसलेला सापही त्याच्या तोंडात आला. सापाच्या मधील भाग गाढवाच्या तोंडात होता. साप गाढवाच्या तोंडात अडकला.
गाढवाने साप आपल्या तोंडातून बाहेर पडावा म्हणून खूप प्रयत्न केले. आपलं डोकं-मान हलवली मात्र साप काही बाहेर येईना. साप तोंडाच्या बाहेरही येत नव्हता आणि तोंडाच्या आतही जात नव्हता. गाढवाच्या तोंडातून बाहेर पडण्यासाठी सापही प्रयत्न करत होता. मात्र त्यालाही बाहेर पडता येत नव्हतं. यादरम्यान तो गाढवाच्या गळ्याला आणि तोंडाला चावला.
हे वाचा - बकाबक खातोय ताटभर गुलाबजाम; VIDEO पाहताना तुम्हीही म्हणाल, अरे!आता तरी थांब
स्वत:चा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करता करता काही वेळातच सापाचा मृत्यू झाला. त्यानंतरही तो गाढवाच्या तोंडातच होता. यानंतर दोन ते तीन तासांनी गाढवाचा मृत्यू झाला कारण त्याला साप चावला होता आणि त्याचं विष त्याच्या शरीरात पसरलं. प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं, साप आणि गाढवामध्ये खूप वेळ संघर्ष सुरू होता. दोघंही एकमेकांपासून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तसं करू शकले नाहीत आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.
हे वाचा - पाण्याबाहेर तडफडणाऱ्या माशासाठी छोट्याशा डुकरांची धडपड; हृदयस्पर्शी VIDEO VIRAL
या घटनेदरम्यान तिथून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही लोकांनीच हा व्हिडीओ बनवला. मात्र घाबरून कुणीही सापाच्या आणि गाढवाच्या जवळ गेलं नाही आणि गाढव-साप दोघांचाही मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Snake, Social media viral, Viral videos