मराठी बातम्या /बातम्या /Viral /इन्स्टाग्रामवर घेत होती Live सेशन; नराधमाने केलं घृणास्पद कृत्य, अभिनेत्री हादरली!

इन्स्टाग्रामवर घेत होती Live सेशन; नराधमाने केलं घृणास्पद कृत्य, अभिनेत्री हादरली!

हनियाला हे समजताच तिने त्वरित इन्स्टाग्राम लाइव्हचं सत्र संपवलं.

हनियाला हे समजताच तिने त्वरित इन्स्टाग्राम लाइव्हचं सत्र संपवलं.

हनियाला हे समजताच तिने त्वरित इन्स्टाग्राम लाइव्हचं सत्र संपवलं.

जगभरात अनेक प्रकारचे मनोरुग्ण आहेत. मात्र लैंगिकदृष्ट्या मनोरुग्ण अधिक घातक असतात. असाच एक धक्कादायक प्रकार पाकिस्तानमध्ये घडला आहे. येथे पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर इन्टाग्राम लाइव्ह सेशन करीत होती. यादरम्यान एक लिंगपिसाट फॅन हस्तमैथून करू लागला. हनियाला हे समजताच तिने त्वरित इन्स्टाग्राम लाइव्हचं सत्र संपवलं. नंतर तिने एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली आणि अशा मानसिक रूग्णांवर टीका केली आहे. जगातील कोणताही भाग स्त्रियांसाठी सुरक्षित आहे का? असा सवाल तिने यावेळी केला आहे.

हनियाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'या जगात जे महिलांचा द्वेष करतात आणि त्यांच्यावर अधिराज्य गाजवतात. ते इतरांच्या मतांचा आदर करीत नाही. जेथे स्त्रीचा तिरस्कार करणाऱ्या पुरुषाची स्तुती केली जाते. मात्र जर हेच महिलेने केले तर तिचा द्वेष केला जातो.

जिथे आपल्या प्रियजनांवर प्रेम करणारी आणि त्यांच्याशी बोलणारी महिला चुकीची असते, परंतु एका महिलेच्या फोटोसमोर हस्तमैथुन केल्याचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अत्यंत उदास होत आपल्या बहिणीसोबत बोलताना अश्रू पुसताना दिसत आहे. हानिया आमिर सोशल मीडियावर नियमित आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असते.

हे ही वाचा-फेसबुक पोस्टची कमाल! 46 वर्षांनी महिलेला परत मिळालं हरवलेलं पाकीट

ही घटना गेल्या शुक्रवारी घडली आहे. जेव्हा हानिया आमिर हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाइव्ह होती आणि चाहत्यांशी बातचीत करीत होती. यादरम्यान एका चाहत्याने तिच्या फोटोसमोर कथित स्वरुपात हस्तमैथून केलं. हे सर्व पाहून हानियाला धक्काच बसला. आणि तिने तातडीने लाइव्ह सेशन बंद केलं. या संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक युजर्स सोशल मीडियावर मनोवैज्ञानिक प्रभावांबद्दल बोलताना दिसत होते. अनेक युजर्सचं म्हणणं होतं की, अशा प्रकारची विकृती, ट्रोलिंग कोणाचा जीवही घेऊ शकते. यामुळे इंटरनेटवर जबाबदारीने वागायला हवं.

First published:

Tags: Instagram, Pakistan