वेट्रेस झाली मालामाल; सासुच्या अंगावर ग्रेव्ही सांडायला सुनेनं दिली हजारोंची टीप

वेट्रेस झाली मालामाल; सासुच्या अंगावर ग्रेव्ही सांडायला सुनेनं दिली हजारोंची टीप

परदेशामधल्या एका लग्नात घडलेला एक जुना सासू-सुनेचा किस्सा एका वेट्रेसने टिकटॉकवर शेअर केला आहे.

  • Share this:

लग्न म्हटलं की काही गोष्टी कमी-जास्त होणं, मानपान, नकळतपणे घडणाऱ्या गमतीजमती हे ओघानी आलंय. आणि सासू-सुनेचे संबंध हेही संपूर्ण जगात सारखेच. टीव्ही सिरीयलमध्ये जरी गुणी सासू किंवा सून दाखवली गेली तरीही प्रत्यक्ष आयुष्यात मात्र तसं घडत नसतं हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणूनच आपण मराठीत म्हणतो‘घरोघरी मातीच्या चुली.’

हे सांगायचं कारण असं की परदेशामधल्या एका लग्नात घडलेला एक जुना सासू-सुनेचा किस्सा एका वेट्रेसने टिकटॉकवर शेअर केला आहे आणि तो तुफान व्हायरल होतोय.@chloe_beeeeया नावाचं अकाउंट असलेली महिला वेट्रेस म्हणून काम करायची. नोकरीच्या सुरुवातीच्या काळातला एक किस्सा शेअर केला आहे. परदेशी लग्नांमध्ये नववधू पांढराशुभ्र ड्रेस परिधान करते त्यामुळे सहाजिकच इतरांनी तितका सुंदर ड्रेस त्या लग्नात परिधान करू नये असा एक संकेत असतो. जेणेकरून इतरांपेक्षा वेगळा ड्रेस असल्यामुळे तिचं कौतुक होईल. पण या लग्नात जरा वेगळंच घडलं. च्लो बी हँडल चालवणाऱ्या वेट्रेसने या व्हिडिओत हा किस्सा सांगितला. ती म्हणाली,‘मी नवखी होते आणि पहिल्यांदाच लग्नात वेट्रेस म्हणून काम करत होते. मी ग्रेव्हीनी भरलेलं भांडं भरून घेऊन जात होते आणि माझ्याकडून चुकून वराच्या आईच्या ड्रेसवर ती ग्रेव्ही सांडली. ती संपूर्ण ड्रेसवर पसरली. सुदैवाने त्यांना भाजलं नाही. पण त्यामुळे त्यांना तो ड्रेस बदलायला लागला. दोन्ही पक्ष स्थानिकच होते त्यामुळे त्या भावी सासूबाई घरी जाऊन नवा ड्रेस परिधान करून आल्या.

मी मात्र स्वत:ला दोष देत बसले होते. माझ्यामुळे लग्नाला गालबोट लागलं. माझ्या डिप्रॅक्सियामुळे म्हणजे वेंधळेपणामुळे हे घडलं असं म्हणत होते पण नियतीच्या मनात वेगळंच चाललं होतं. या घटनेमुळे वधू प्रचंड आनंदी झाली होती आणि तिनी मला 55 पाउंड (म्हणजे सुमारे 5 हजार 500) टिप दिली आणि जवळ येऊन शेकहँड केलं. त्या वधूलाआनंद होण्याचं कारण हे होतं की तिच्या लग्नात तिच्या सासूनेच पांढरा ड्रेस परिधान केल्यामुळे ती नाराज झाली होती पण होणारी सासू असल्याने काही बोलता येत नव्हतं. पण परस्पर वेट्रेसमुळे तिचं काम झालं. अजूनही आम्ही रस्त्यात दिसलो की एकमेकींना हाय करतो.’या वेट्रेसने सांगितलेला किस्सा इतका व्हायरल झाला आहे की त्याला आतापर्यंत 4 लाख 50 हजार व्ह्यूज आणि 103,000लाइक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनीही तुफान प्रतिक्रिया देऊन गंमत आणली आहे. एकानी म्हटलंय,‘च्लो तुला नक्की आठवतंय ना तू ग्रेव्ही सांडल्यावरच तुला पैसे मिळाले होते ना?की आधी...’दुसऱ्यानी म्हटलंय हे ज्याचंत्याचं कर्म असतं. अनेकांनी वधूच्या वतीने च्लोला अनेकानेक धन्यवाद दिले आहेत. असे हे किस्से जगभर घडत असतात. त्यात क्षणिक मजा असते आणि काही वर्षांनी त्या आठवणी काढून आपण पुन्हा एकदा हसूही शकतो.

First published: April 17, 2021, 7:50 PM IST

ताज्या बातम्या