• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Shocking : ग्राहकानं जेवणाबाबत तक्रार करताच भडकली वेट्रेस; रागात बंदूक ताणली अन्...

Shocking : ग्राहकानं जेवणाबाबत तक्रार करताच भडकली वेट्रेस; रागात बंदूक ताणली अन्...

कँडी फ्रँक्लिन नुकतंच वेफल हाउस रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. ही एक फूड चैन आहे. कँडीनं सांगितलं, की त्यांनी वेट्रेसला चीज एग आणण्यास सांगितलं

 • Share this:
  नवी दिल्ली 17 ऑक्टोबर : कोणताही व्यक्ती असा विचार करून रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) जेवायला जातो, की इथे आपल्याला चांगलं जेवण मिळेल आणि स्टाफही आपली सेवा करेल. रेस्टॉरंट आणि हॉटेलमधील स्टाफलाही (Hotel Staff) यासाठी पूर्णपणे तयार केलं जातं. ग्राहकासोबत ते अगदी नम्रपणे वागतात. मात्र, अमेरिकेतील एका व्यक्तीला वेगळाच अनुभव आला. यात वेट्रेसनं (Waitress) ग्राहकावरच बंदूक ताणली. या व्यक्तीचा अनुभव ऐकून सगळेच हैराण झाले. 2017मध्ये केलेल्या तक्रारीला कंपनीनं 4 वर्षानी दिलं उत्तर; वाचून थक्क झाली महिला अमेरिकेच्या एटलांटामध्ये राहणाऱा कँडी फ्रँक्लिन नुकतंच वेफल हाउस रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. ही एक फूड चैन आहे. कँडीनं सांगितलं, की त्यांनी वेट्रेसला चीज एग आणण्यास सांगितलं. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर वेट्रेस त्याची ऑर्डर घेऊन आली. मात्र तिनं फक्त एग आणलं होतं. याच कारणावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला, जो कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जेवणावरुन होतो. मात्र, हा वाद इतका वाढेल, असं त्याला वाटलं नाही. कँडीनं सांगितलं, की भांडणानंतर वेट्रेसनं बंदूक त्याच्यावर ताणली (Waitress pulls out gun). बंदूक पाहून कँडी घाबरला. तिथे उपस्थित इतर लोकही रेस्टॉरंटमधून बाहेर पळाले. या महिलेच्या सौंदर्यावर भलेभले फिदा; चेहरा पाहून नाही येणार वयाचा अंदाज डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कँडीनं सांगितलं की तोही घाबरला आणि तिथून निघाला. वेट्रेसनं त्याला म्हटलं, की त्याचा मेंदू बाहेर काढेल. कँडीनं सांगितलं, की याआधीही त्यांना असाच एक हिंसक अनुभव आलेला आहे. एका भांडणात अनोळखी व्यक्तीनं त्याच्या भावावर गोळीबार केला होता. यात त्याचा मृत्यू झालेला. मिळालेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंटनं या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, आता परत कधीही या रेस्टॉरंटमध्ये येणार नसल्याचं कँडीनं म्हटलं. कँडीनं सांगितलेलं, की वेट्रेससोबत झालेलं त्यांचं भांडण अधिक गंभीर नव्हतं. मात्र, छोट्या वादानंतर वेट्रेसनं बंदूक काढल्यानं कँडी हैराण झाला.
  Published by:Kiran Pharate
  First published: