मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वेटरच्या सतर्कतेमुळे वाचला चिमुकल्याचा जीव; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

वेटरच्या सतर्कतेमुळे वाचला चिमुकल्याचा जीव; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की हा लहान मुलगा आपल्या आवडीची चॉकलेट न मिळाल्याने आपल्या आईवर रागवतो आणि तिला धक्का देत हॉटेलमध्ये येतो.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 27 नोव्हेंबर : देव तारी त्याला कोण मारी ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. मात्र आता याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. इंटरनेटवर व्हायरल होणारा व्हिडिओ (Video Viral on Social Media) पाहून तुम्हालाही ही म्हण आठवेल. सोबतच तुम्ही या चिमुकल्या मुलाच्या मदतीला धावून आलेल्या वेटरचंही कौतुक कराल. या वेटरने आपल्या हातातील ट्रेमधील सर्व खाद्यपदार्थ खाली पडू दिले आणि क्रॉकरीचंही नुकसान होऊ दिलं, मात्र लहान मुलाचा जीव वाचवला.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की हा लहान मुलगा आपल्या आवडीची चॉकलेट न मिळाल्याने आपल्या आईवर रागवतो आणि तिला धक्का देत हॉटेलमध्ये येताना दिसतो. पुढच्याच क्षणी तो समोर असलेल्या फॅन्सी शो केसमधून चॉकलेट घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी दरवाजा उघडतो. मात्र या कपाटाचं नियंत्रण बिघडतं आणि या मुलावरही ते पडू लागतं. इतक्यात खाद्यपदार्थांनी भरलेला ट्रे घेऊन जाणाऱ्या वेटरचं याकडे लक्ष जातं. तो पळत येत हे कपाट पकडतो आणि या मुलाचा जीव वाचवतो.

हे पाहून मुलाची आईदेखील पळत येऊन हे कपाट पकडते आणि मुलाचा जीव वाचवते. हा व्हिडिओ ट्विटरवर आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ तीन हजारहून अधिकांनी पाहिला आहे. आपल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, रेस्टॉरंट वर्करची सतर्कता आणि क्विक रिअॅक्शनमुळे मुलाचा जीव वाचला. #SituationalAwareness आपल्या सर्वांसाठीच गरजेचं आहे. सतर्कतेमुळे अनेक दुर्घटना टळतात आणि गरज पडल्यावर दुसऱ्यांनाही वाचवता येतं.

First published:

Tags: Shocking video viral, Video Viral On Social Media