नव्या कोऱ्या गाडीला 30 मीटर उंचीवरून खाली फेकलं, अशी झाली गाडीची अवस्था; पाहा VIDEO

क्रेनला बांधून 30 मीटर उंचीवरून गाडी फेकल्यानंतर जे काही घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही. पाहा VIDEO

क्रेनला बांधून 30 मीटर उंचीवरून गाडी फेकल्यानंतर जे काही घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही. पाहा VIDEO

  • Share this:
    लंडन, 19 नोव्हेंबर : नवी गाडी घेतल्यानंतर तिला जरा तरी खरचटलं तरी लोकांचा जीव वर खाली होतो. मात्र जर नवी कोरी गाडी 30 मीटर उंचीवरून खाली फेकली तर? विश्वास नाही बसणार ना. मात्र एका गाडीच्या क्रॅश टेस्टसाठी असं करण्यात आलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वोल्वो कंपनीने ही क्रॅश टेस्ट केली होती. हा व्हिडीओ volvo car UK या ट्वीटर हॅंडरवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये, गंभीर अपघातानंतर लोकांना वेळत बाहेर काढण्यासाठी आमच्या आपत्कालीन सेवांना नवीन मार्ग देण्यासाठी आम्ही मदत करत आहोत. यासाठी नेहमीचे क्रॅश टेस्टपेक्षा आम्ही यावेळी काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला. वाचा-भीषण दुर्घटना, रत्नागिरीत धावत्या रोरो रेल्वेतून ट्रक कोसळला, धक्कादायक VIDEO volvo नं यावेळी चक्क नवी गाडी क्रेनला बांधून 30 मीटर उंचावरून तिला फेकलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा-समुद्रावर पर्यटकांची गर्दी असतानाच कोसळली दरड, थरारक LIVE VIDEO आला समोर क्रॅश टेस्ट करण्यामागे कंपनीचा उद्देश आहे की, अपघातानंतर गाडी अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढता यावे. यासाठी ही टेस्ट महत्त्वाची आहे. क्रॅश टेस्ट केल्यानंतर बचाव कार्य कसे करावे, याबाबत कळते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्वीटरवर लोकांनी भारतातील गाड्यांचेही क्रॅश टेस्ट व्हावी अशी मागणी केली आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published: