Home /News /viral /

Watch Video: लग्नाच्या दिवशीच मुलीच्या वडिलांनी जावयाला दाखवला दंडूका

Watch Video: लग्नाच्या दिवशीच मुलीच्या वडिलांनी जावयाला दाखवला दंडूका

मुलीच्या लग्नात (Father Daughter Relationship) वडील खूप शांत आणि त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव असतात.

  नवी दिल्ली, 05 सप्टेंबर: स्वतःच्या मुलीच्या लग्नात प्रत्येक वडिलांची स्थिती पूर्णपणे बदलते. मुलीच्या लग्नात (Father Daughter Relationship) वडील खूप शांत आणि त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव असतात. मात्र सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बापलेकीच्या नात्याची एक झलक बघायला मिळत आहे. (Wedding Video) हातात दंडूका घेऊन जावयाचं स्वागत हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या लग्नाच्या व्हिडिओपेक्षा थोडा वेगळा आहे. वडील-मुलीच्या नात्याची सर्वात सुंदर झलक या (Rajput Wedding Video) राजपूत वेडिंग व्हिडिओमध्ये (Viral Video)पाहायला मिळतेय. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुलीचे वडील हातात काठी घेऊन बसले आहेत. त्यांच्या बाजूला नवरी मुलगी म्हणजे त्यांची मुलगी आहे. तसंच मुलीची आई सुद्धा जवळच उभी आहे. मुलीचे वडील दंडूका घेऊन नवऱ्या मुलीशी म्हणजेच आपल्या जावयाशी काही बोलत आहेत. (Bride Groom Video)
  भावूक झाले वडील हा व्हिडिओ इन्स्टाग्राम रील व्हिडिओवर (Instagram Reels Video) शेअर करण्यात आला आहे. यामध्ये वधूचे वडील जावयाशी बोलताना भावूक झालेले दिसत आहेत. आपल्या मुलीची सासरी पाठवणी करण्यापूर्वी ते जावयाला तिची काळजी घेण्याचा सल्ला देत आहे. तसंच त्याला सर्वकाही नीट समजावून सांगा. वडिलांचे हे रूप पाहून मुलगीही खूप भावूक होत आहे. हेही वाचा- लग्नाचं आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार; भाजप खासदाराच्या मुलाचं धक्कादायक कृत्य  वडिलांना मिठी मारुन रडली मुलगी या इमोशनल व्हिडिओमध्ये (Emotional Video)वडिलांचं प्रेम बघून नवरी मुलगी त्यांना मिठ्ठी मारते. आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. प्रत्येकाला हा व्हिडिओ खूप आवडत आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Video viral

  पुढील बातम्या