VIRAL व्हिजिटिंग कार्डची कमाल; गीता मावशींना मिळालं लाखमोलाचं काम!

VIRAL व्हिजिटिंग कार्डची कमाल; गीता मावशींना मिळालं लाखमोलाचं काम!

मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या धनश्री शिंदेंनी घर काम करणाऱ्या गीता मावशीचं व्हिजिटिंग कार्ड तयार केलं आणि त्याच्या व्हायरल फोटोनेच कमाल केली.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर : सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. पण त्यातून अनेक चांगल्या गोष्टीही होतात. सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती घर काम करणाऱ्या मावशीच्या व्हिजिटिंग कार्डची. पुण्यात बावधनमध्ये काम मिळवण्यासाठी व्हिजिटिंग कार्ड छापलं पण ते इतरांना देण्याआधीच जगभर पोहचलं. ती कमाल केली सोशल मीडियाने. त्यानंतर इतके फोन त्या गीता मावशीला यायला लागले की शेवटी फोनच बंद करावा लागला. त्यांना काम पुण्यातील बावधनमध्ये हवं होतं पण फोन मात्र पुणे, मुंबईसह देशातून येत आहेत. या व्हिजिटिंग कार्डची कल्पना सहज सुचली असली तरी त्या एका कल्पनेनं केलेलं काम लाखमोलाचं आहे.

बावधनच्या गीता काळे यांना कामाची गरज होती. हे काम शोधायचं कसं याचीच चिंता त्यांना होती. ती चिंता या एका व्हिजिटिंग कार्डने दूर केली. हे व्हिजिटिंग कार्ड ज्यांच्या कल्पनेतून तयार झालं त्या धनश्री शिंदेंनी त्यामागची कहाणी फेसबुकवर सांगितली आहे. मुळच्या कोल्हापूरच्या असलेल्या धनश्री यांनी त्यांचे ब्रँडिंगचे कौशल्य वापरून तयार केलेलं हे व्हिजिटिंग कार्ड फक्त सोशल मीडियामुळे कुणालाही न देता जगभर चर्चेत आलं. सध्या मावशींना देशभरातून फोन येत आहेत.

धनश्री शिंदे यांनी म्हटलं की, बऱ्याच दिवसांनी घरी परतल्यानंतर जेव्हा काम करताना गीता मावशीला बघितलं तेव्हा ती निराश असलेलं जाणवलं. तिच्या काळजीचं काऱण विचारलं तर तिने हातातलं काम गेल्याचं सांगितलं. यात तिचा दोष नव्हता पण परिस्थितीमुळे काम बंद झालं होतं. यामुळे तिला महिन्याला मिळणारे जवळपास 4 हजार रुपये बंद होणार होते.

Alert! बँक खातं रिकामं करणारं APP तुमच्या मोबाइलमध्ये? लगेच करा DELETE

गीता मावशीची कहाणी ऐकल्यानंतर आपण काहीतरी करावं असा विचार धनश्री शिंदे यांच्या मनात आला. जाहिरात, ब्रँडिग आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या धनश्री यांनी त्यांच्या कौशल्याचा वापर करायचं ठरवलं. त्यांनी लगेच गीता मावशीला तिचं व्हिजिटिंग कार्ड काढू असं सांगितलं. घर कामासाठी मावशी पाहिजे असेल अशा लोकांपर्यंत ते वॉचमन किंवा इतरांमार्फत पोहचवता येईल असा विचार केला. व्हिजिटिंग कार्डची कल्पना सत्यात उतरवण्यासाठी मावशींकडून त्यांचे काम आणि त्या कामाचे दर विचारले. तसेच सध्याची गरज म्हणून आधार कार्ड नंबरदेखील टाकला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 100 कार्ड प्रिंट काढून आणली.

अनिल कुंबळेचा वारसदार; 15व्या वर्षीच केली 'परफेक्ट 10'ची कामगिरी!

व्हिजिटिंग कार्ड छापून घरी आणल्यानंतर त्यातली काही कार्ड धनश्री शिंदेंनी त्यांच्याकडे ठेवून घेतली आणि उरलेली गीता मावशीकडे दिली. त्यानंतर फक्त एका दिवसाच्या आत हे कार्ड सोशल मीडियावर इतकं व्हायरल झालं की गीता मावशीला फोन बंद करावा लागला. धनश्री शिंदेंनी त्या कार्डचा फोटो मित्रासोबत शेअऱ केला होता. त्याने तो अनेक ग्रुपमध्ये शेअर केला आणि व्हायरल झाल्यानंतर त्याला सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

आता गीता मावशींना काम मिळालं असल्याचं धनश्री शिंदे यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितलं. गीता मावशींच्या कार्डवर असलेल्या नंबरला आता धनश्रीच उत्तर देत आहेत. गीता मावशींना वेगवेगळ्या रेडिओ आणि टीव्ही माध्यमांकडून कॉल येत आहेत. जेव्हा मावशींना विचारण्यात आलं की तुम्हाला बावधनमध्ये काम मिळालं का? त्यावर मिळालं असून सध्या तरी कामाची गरज नसल्याचं त्या म्हणाल्या.

ट्राफिकच्या नव्या नियमामुळे वाढले 'या' चोरीचे प्रकार, पाहा महिलेनं काय केलं

================================================================

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 03:12 PM IST

ताज्या बातम्या