मुंबई,10 डिसेंबर: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवे व्हिडीओ शेअर केले जातात. यामधील काही व्हिडीओ हे त्याच्या वेगळेपणामुळे चांगलेच व्हायरल (Viral Video) होत असतात. सध्या देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका कुत्र्यानं अंध व्यक्तीला मदत केली असल्याचं (Dog helps man) दिसत आहे. हा व्हिडीओ अनेक यूजर्सना आवडला असून अल्पावधीतच हिट झाला आहे.
‘द फिल गुड पेज’ या ट्विटर (Twitter) अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओत एक महिला तिच्या कुत्र्यासोबत बागेत फिरताना दिसत आहे. महिला पुढे आणि कुत्रा तिच्या मागे चालत आहेत. त्याचवेळी त्यांच्या विरुद्ध बाजूने एक अंध व्यक्ती त्याच्या काठीच्या मदतीनं चालत येत होता.
त्या रस्त्यावर एका ठिकाणी झाडाची फांदी पडली आहे. महिला आणि कुत्र्यानं ती फांदी ओलांडली. आता अंध व्यक्ती त्या रस्त्यावर पडलेल्या फांदीच्या दिशेन जात आहे. त्यावेळी खरंतर महिलेनं स्वत:हून ती फांदी रस्त्यामधून बाजूला करणे अपेक्षित आहे. पण ती तसं करत नाही. ती अंध व्यक्तीच्या डोळ्यासमोर हात हलवते. ‘तो व्यक्ती नक्की अंध आहे ना?’ याची खात्री करते आणि पुढे चालू लागते.
Humanity watch and learn... pic.twitter.com/eEKwA92YmB
— The Feel Good Page ❤️ (@akkitwts) December 9, 2020
हे वाचा-OMG! शेकडो माशांना पुरून उरला बदल; एका घासासाठी कसा भिडला पाहा VIDEOV
महिलेची ही सर्व कृती तिच्या पाठीमागे चालत असलेला कुत्रा पाहत असतो. त्या महिलेकडून जे काम अपेक्षित असलेलं काम तो कुत्रा करण्याचं ठरवतो. कुत्रा परत येऊन त्याच्या दातानं रस्त्यावर पडलेली फांदी दूर करतो. कुत्रा फांदी रस्त्याच्या एका बाजूला कुणाच्याही पायात येणार नाही, अशी ठेवतो. त्यामुळे विरुद्ध बाजूनं येणारी अंध व्यक्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय चालू शकते.
समजदार कुत्र्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांना आवडला आहे.