ATM मशीनमधून पैसे निघाले नाहीत म्हणून चोरांनी चक्क आणला JCB, पाहा हा Viral Video

ATM मशीनमधून पैसे निघाले नाहीत म्हणून चोरांनी चक्क आणला JCB, पाहा हा Viral Video

गॅस स्टेशनवरील CCTV कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून, चोरांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने एटीएमच्या बाहेरील सर्व बाजू उखडून काढून त्यातून एटीएम मशीन चोरलं.

  • Share this:

आयलंडमध्ये चोरांनी एटीएम मशीन चोरण्यासाठी काही असं केलं की लोकांनी तोंडात बोटच घातली. सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चोरांनी तोंडाला मास्क लावून गॅस स्टेशनवरील एटीएम मशीन चोरली. विशेष म्हणजे हे मशीन चोरण्यासाठी त्यांनी चक्क JCB ची मदत घेतली. ग्लोबल न्यूज नेटवर्क RT ने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. चोरांच्या या विचित्र कृतीने सारेच पेचात पडले असून प्रत्येकजण आपआपल्या परिने यावर प्रतिक्रिया देत आहेत.

गॅस स्टेशनवरील CCTV कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून, चोरांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने एटीएमच्या बाहेरील सर्व बाजू उखडून काढून त्यातून एटीएम मशीन चोरलं. एवढंच नाही तर ते मशीन गाडीच्या छतावर ठेवून ते गाडी घेऊन पसार झाले. द गार्जियनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, चोरांनी जवळच्या कन्स्ट्रक्शन साइटवरून जेसीबी मशीन चोरलं होतं.

या गॅस स्टेशनवर अशा प्रकारे चोरी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. चोरांनी आतापर्यंत 11 वेळा एटीएम मशीन चोरली आहे.सध्या पोलीस चोरांचा तपास घेत असून पुढील चौकशी करत आहेत. मात्र तोवस सोशल मीडियावर चोरीचा हा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत 2 लाखांहून अधिकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

वयाने मोठ्या मुलीशी लग्न करण्यापूर्वी हे एकदा वाचाच!

ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या जाचाला वैतागलाय... सुटकेचे हे आहेत स्मार्ट पर्याय

तांब्यांच्या भांड्यांमध्ये चुकूनही ठेवू नका या गोष्टी, नाहीतर...

या टीप्सने तुम्ही झटपट फेडू शकता कर्ज, एकदा वाचून पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 03:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading