मोबाइल पाहता- पाहता रेल्वे रुळांवर पडली महिला, समोर आली ट्रेन, पाहा हा Viral Video

व्हिडीओनुसार, ती महिला रुळांवर पडताच तिला पकडण्यासाठी तेथील लोक तिच्या जवळ गेले मात्र तेवढ्यात ट्रेन आली.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 01:44 PM IST

मोबाइल पाहता- पाहता रेल्वे रुळांवर पडली महिला, समोर आली ट्रेन, पाहा हा Viral Video

स्पेनच्या मॅड्रिडमध्ये ही घटना घडली. या अपघाताचा व्हिडीओ पाहून प्रत्येकाला धक्का बसला. रेल्वे स्थानकावर एक महिला फोनमध्ये पाहण्यात एवढी गुंतली होती की ती रुळांवर जाऊन पडला आणि तेवढ्यात समोरून ट्रेन आली. 24 ऑक्टोबरला हा व्हिडीओ मेट्रो दे मॅड्रिडने शेअर केला आहे. व्हिडीओत स्पष्ट दिसतं की, ती महिला मोबाइलमध्ये व्यग्र होती आणि त्यातच ती रुळांवर जाऊन पडली. त्याचवेळी ट्रेनही स्थानकावर आली.

उत्तर मॅड्रिड येथील एस्ट्रेचो रेल्वे स्थानकावरील ही घटना आहे. व्हिडीओनुसार, ती महिला रुळांवर पडताच तिला पकडण्यासाठी तेथील लोक तिच्या जवळ गेले मात्र तेवढ्यात ट्रेन आली आणि व्हिडीओ तिथेच थांबला. त्यामुळे ती महिला सुरक्षित होती की नाही हे कळू शकलं नाही. सीबीएस न्यूजच्या मते, मेट्रो दे मॅड्रिडने स्पष्ट केले की, त्या महिलेला गंभीर स्वरुपात कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही लिहिले की, 'या प्रकरणात काही झाले नाही. प्रवासी सुखरुप आहे.'

Loading...

हा व्हिडीओ आतापर्यंत 30 हजार लोकांहून अधिकांनी पाहिला असून अनेकजण सोशल मीडियावरच महिलेला खडेबोल सुनावत आहेत. एका प्रवाशाने लिहिले की, 'आपल्या सुरक्षेसाठी, प्लॅटफॉर्मवर चालताना मोबाइलमध्ये पाहू नका.'

VIDEO: जेव्हा कावळ्याने केला चिमणीच्या बाळावर हल्ला, तेव्हा झालं असं काही...

नदीत तरंगणार हॉटेल होतंय तयार, 2020 च्या बुकिंगलाही झाली सुरुवात

फेवरेट पदार्थ खाऊनही आता वाढणार नाही तुमचं वजन, ही आहेत कारण

वडिलांचं नाव 'मध्यप्रदेश', मुलाचं नाव 'भोपाळ'.. अनोखी आहे नाव ठेवण्याची ही पद्धत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 01:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...