नवी दिल्ली, 13 डिसेंबर: 31 डिसेंबर 2019 च्या रात्री जेव्हा आपण सर्वजण नवीन वर्ष साजरं करीत होतो, तेव्हा कुणालाही असं वाटलं नव्हतं की 2020 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी इतकं खडतर असेल. या वर्षाची सुरुवात देखील चांगली झाली होती, पण फेब्रुवारीच्या शेवटी एका अभूतपूर्व कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगभर हाहाकार माजवला. भारतात या विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरूवातीला थोडेफार प्रयत्न झाले, पण याचा फारसा फरक पडला नाही. त्यामुळे मार्च अखेर भारतात देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.
यावेळी पुढील बरीच महिने घरात बसावं लागेल, याची कोणालाही कल्पना नव्हती. या एकांतवासातील वेळेचा काहींनी अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने वापर केला, तर काहींनी नवीन शोध लावले. मोकळ्या वेळेत लोकांनी केलेल्या क्रिएटिव्हीटीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. या काळात सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल झाले. या व्हिडिओंनी आपल्याला पून्हा पून्हा पाहण्यास भाग पाडलं. अशाच काही व्हायरल व्हिडीओंबद्दल आपण जाणून घेऊया, ज्या व्हिडिओने आपल्या 2020 सालच्या एकांतवासाला अधिक सुंदर बनवलं.
रसोडे में कौन था
सध्या टीव्हीवर सुरू असलेली ‘साथ निभाना साथिया’या मालिकेतील एक सीन देखील एक रॅप होऊ शकतो, याचा विचारही कोणी केला नव्हता. पण साउंड इंजिनिअर असलेल्या यशराज मुखाते यानं मोकळ्या वेळेचा चांगल्याप्रकारे वापर करून घेतला. त्यांनं या मालिकेतील गोपी बहु आणि कोकिलाबेन या दोन पात्रांच्या संवादांच रॅप व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर ज्याच्या त्याच्या तोंडात एकच प्रश्न होता, रसोडे में कौन था?
First World Problems • Made Kokila Ben sing this time • I love doing harmonies, enjoyed this one a lot •
Kahi share karoge toh credits zaroor dena. Dhanyawaad!♥️♥️♥️#kokilaben #gopinahu #rashi #cooker #saathnibhanasaathiya #yashrajmukhate #ymstudios pic.twitter.com/4TcWwAcH7q
— Yashraj Mukhate (@YBMukhate) August 21, 2020
कोविड -19 रुग्णांचा धमाल डान्स
कोरोनाच्या भीतीने लोकांच्या जीवनातून आनंद गायब झाला होता. दरम्यान, कर्नाटकातील बल्लारी हॉस्पिटलचा एक व्हिडिओ समोर आला, या व्हिडिओने पून्हा एकदा लोकांच्या मनाच जगण्याची उमीद पेरली. स्वतः बद्दल सकारात्मक विचार करायला भाग पाडलं. या व्हिडिओत रुग्णांनी एकदम धमाल डान्स केला होता.
बाल्कनीत येऊन कला सादर केली
इटलीतील काही लोकांनी बाल्कनीला एक स्टेज बनवण्याचा निर्णय घेतला होता. कारण सिएना येथील शेकडो लोकांनी आपल्या बाल्कनीत उभं राहून इटालियन बलाडचं कला प्रदर्शन केलं. त्याच वेळी नेपल्समधील काही लोकांनी एब्रैकेम कला सादर केली. यातील 3-4 कला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या.
व्हिडीओमध्येच रोपं वाढताना पाहिली गेली
9 दशलक्षाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओचं वैशिष्ट्यं म्हणजे टाइम लॅप्स. टाइन लॅप्सच्या मदतीने रोपांची होणारी वाढ आणि त्यामध्ये होणारे छोटेछोटे बदल वापरकर्त्यांनी अत्यंत क्रिएटिव्ह पद्धतीने टिपले आहेत. या व्हिडिओचं कौतुक इवांका ट्रम्प आणि एलन मस्क सारख्या सेलिब्रिटींनी देखील केलं.
تصوير حركة نباتات خلال "٢٤" ساعة.
حياة🌿 pic.twitter.com/WeUPz1L0EC
— ميلورا (@Melora_1) September 3, 2020
शिक्षिका गॅरेजमध्ये येऊन शिकवू लागली
कोरोना साथीनं मुलांची शाळा आणि त्यांचे मित्र असं त्यांचं चिमुकलं विश्वचं हिरावून घेतलं होतं. पालक, शिक्षक किंवा मुलं यांच्यापुढे केवळ डिजिटल शिक्षण हाच एकमेव पर्याय होता. कोरोना काळात अनेक मुलांनी शिक्षणाकडं दुर्लक्ष केलं. पण अमेरिकेतील एका चिमुकलीच्या बापाने आपल्या गॅरेजचं रुपांतर क्लासरुम मध्ये केलं.
या क्लासरुमध्ये त्यानं एका व्यक्तीचं कट आउट तयार केलं आणि त्यावर टॅब बसवला. जेणेकरुन त्या मुलीला आपण शाळेतच बसून शिकत आहोत याचा अनुभव आला. या व्हिडिओचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक केलं होतं.